Wednesday, June 26, 2024
Homeधुळेऐकावे ते नवलच ; सॅनेटरीपॅडच्या बनावट बिल्टीने ‘व्हीस्की’, ‘बिअर’ची वाहतूक

ऐकावे ते नवलच ; सॅनेटरीपॅडच्या बनावट बिल्टीने ‘व्हीस्की’, ‘बिअर’ची वाहतूक

धुळे – प्रतिनिधी dhule

- Advertisement -

सॅनेटरी पॅडच्या बनावट बिल्टीने बिअर (Beer) आणि व्हीस्कीची (Whiskey) वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकाने उघड केली. अवधान फाट्यावर आयशर ट्रकला पकडण्यात आले. ट्रकसह दारू असा १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

ही दारू गोवा (Goa) येथून सुरत येथे नेली जात होती. याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आयशर ट्रकमधून (क्र. युपी ८० एफटी ९३९८) बेकायदेशिररित्या विदेशी दारु ही आर्वी-धुळे मार्गे सुरतकडे नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना आज मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवधान फाटा येथे आर्वीकडुन धुळ्याकडे येणार्‍या वाहनांची तपासणी सुरू केली. तेव्हा संशयीत ट्रक धुळ्याकडे जात असल्याचे दिसल्याने अडथळा करुन ट्रकला थांबविण्यात आले.

ट्रकवरील चालकाने त्याचे नाव अर्जुन रामजीत बिंद (वय २४ रा.शेखाही पो.अधनपुर ता.शाहगंज जि.जौनपुर, उत्तरप्रदेश) व क्लिनरने सोमनाथ नाना कोळी (वय २६रा.खामखेडा ता.शिरपुर) असे सांगितले. दोघांना ट्रकमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी ट्रकमध्ये सॅनीटरी पॅड असल्याचे सांगून त्याबाबत मालाची बनावट बिल्टी दाखविली. त्यामुळे ट्रकमध्ये बेकायदेशीर दारू साठा असल्याच्या दाट संशयावरून ट्रकसह दोघांना ताब्यात घेत पोलीस अधिक्षक कार्यालयात आणून ट्रकची तपासणी करण्यात आली.

ट्रकच्या पाठीमागील बाजुला सॅनीटरी पॅडच्या गोण्या भरल्याचे व समोरील बाजुस दारू व बिअरचेबॉक्स मिळून आले. ७ लाख ८१ हजार ८०० रुपये किंमतीची देशी/विदेशी विविध कंपन्यांची व्हिक्सीचे एकुण २०५ खोके त्यात एकुण ६ हजार ८०४ दारूच्या बाटल्या, ४० हजार ८०० रुपयांची टुरबो प्रिमियम बीअर स्ट्राँगचे २० बॉक्स त्यात ८४० बाटल्या, १० लाखांचा आयशर ट्रक, १२ हजारांचे सॅनिटरी पॅडच्या पांढर्‍या रंगाच्या १२० गोण्या व १० हजारांचे दोन मोबाईल असा एकुण १८ लाख ४४ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. दोघा आरोपींविरूध्द मोहाडीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी हा माल कोठून आणला व कोठे पाठविणार होते या साखळीमध्ये आणखी कोण आरोपी आहेत का, याबाबत दोघांकडे चौकशी केली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, असई संजय पाटील, पोहेकॉ संतोष हिरे, पोना पंकज खैरमोडे, पोलिस शिपाई महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या