Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारसंचारबंदी कालावधीत प्रवास पास आवश्यक

संचारबंदी कालावधीत प्रवास पास आवश्यक

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीत जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदी दरम्यान प्रवासासाठी पास मिळविण्याकरिता https://epassnandurbar.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

- Advertisement -

वैद्यकीय उपचार, जवळच्या नातेवाईकाचा अंत्यविधी, नोकरीच्या ठिकाणी हजर होणे किंवा इतर तातडीच्या कारणाकरिता प्रवास करतांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्रवास पास देण्यात येणार आहे. प्रवास पास मिळविण्यासाठी https://epassnandurbar.in

संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जासोबत ओळखपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, कोविड चाचणी अहवाल (सर्व प्रवाशांचे प्रवासाच्या दिनांकाच्या पूर्वी ७२ तासाचा आरटीपीसीआर अहवाल नसल्यास सीमेवर रॅपीड अँटीजेन चाचणी करणे आवश्यक राहील

व आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असेल, असे उपजिल्हाधिकारी तथा कोविड पास वितरण कक्षाचे शा.सं. मोरे यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या