Saturday, July 27, 2024
Homeनगरआदिवासी युवकांनी मंदिरावर रेखाटली वारली चित्रकला

आदिवासी युवकांनी मंदिरावर रेखाटली वारली चित्रकला

अकोले |प्रतिनिधी| Akole

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणार्‍या कळसुबाई मंदिरावर काल उत्साही वातावरणात घटस्थापना करण्यात आली. यानिमित्ताने आदिवासी युवकांनी मंदिरावर आकर्षक पध्दतीने वारली चित्रकला रेखाटली आहे.

- Advertisement -

कळसुबाई हे महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम रांगेवर कळसुबाईचे शिखर आहे. त्यामुळे, या रांगेला कळसुबाईची रांग म्हणून ओळखले जाते. सह्याद्री पर्वत रांगेत वसलेल्या कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर किंवा 5400 फूट इतकी आहे. तर शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावापासून त्याची उंची जवळपास 900 मीटर इतकी आहे. कळसुबाई शिखर हे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे. बारी गावात कोळी महादेव या आदिवासी जमातीची मुख्यत्वे वस्ती आहे. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बारी, जहागीरदार वाडी, येथील युवकांनी तीन ते चार दिवसांच्या मेहनतीने सुंदर, रेखीव, आकर्षक अशी वारली चित्रकला मंदिरावर रेखाटली आहे. यावेळी बिरसा ब्रिगेड अकोले तालुका अध्यक्ष पंढरीनाथ खाडे, बिरसा ब्रिगेड उपाध्यक्ष अंकुश करटुले, गुलाब करटुले, ज्ञानेश्वर भागडे, चित्रकार रमेश साबळे, धनेश साबळे, अनिल दराने, भरत घारे, भारत खाडे, संतोष खाडे, केशव खाडे, राजू खाडे तसेच कळसुआई यात्रा कमिटीचे तुकाराम खाडे, रवींद्र खाडे, हिरामण भाऊ खाडे, मनोहर खाडे, यशवंत खाडे, केशव वैराळ, बाळू खाडे, निवृत्ती खाडे, भाऊराव खाडे, पिनाजी खाडे, संतोष खाडे, भरत घोडे, राजू करटुले, गोरख घोडे, संदीप दराने, सोपान दराने, रवी खाडे, एकनाथ खाडे, रामदास खाडे, गणेश खाडे (तालुका संघटक), त्रिंबक खाडे यांनी गावकर्‍यांनी आणि बिरसा ब्रिगेड शिलेदारांनी विशेष योगदानासाठी सहकार्य केले.

नवरात्र उत्सव काळात मोठी गर्दी शिखरावर असते. या ठिकाणी कळसूबाई उत्सव साजरा केला जातो. पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. शिखराच्या कठीण कातळ टप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे 3 ते 4 तासांत कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नवीन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे.

शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण तीन माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथून समोरच खाली भंडारदर्‍याचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रृंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या