त्र्यंबकेश्वर | वार्ताहर |Trimbakeshwar
रविवारच्या सुट्टीमुळे आणि श्रावणी सोमवारसाठी (Shrawan Monday) आलेल्या भाविकांमुळे (Devotees) त्र्यंबकेश्वरला कुशावर्त आणि ब्रह्मगिरी पर्वतावर (Brahmagiri Mountain) गर्दी झाली होती. त्यामुळे ब्रह्मगिरी डोंगराच्या पायऱ्या भाविकांची रांग लागल्याचे दृश्य होते. श्रावण मासनिमित्ताने आलेल्या भाविकांमुळे यावेळी ब्रह्मगिरी गोदावरीच्या उगमस्थानावर गर्दी वाढलेली होती.
भाविक एका पाठोपाठ उतरण्यासाठी लगबग करत होते. गोंधळ सदृश्य स्थिती निर्माण होऊन नये, यासाठी वनविभागाचे (Forest Department) सेवक लक्ष देण्यासाठी हजर नव्हते. यावेळी अजय गांगुर्डे, ऋषिकेश जाधव आदी युवकांनी भाविकांना रांग लावण्याचे तसेच रांगेसाठी सहकार्य करण्याचे मार्गदर्शन केले.
दरम्यान, ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी पर्यटकांकडून (Tourists) ३० रुपये आकारले जातात. परंतु, सुविधा नाहीत वनविभाग लक्ष देत नाहीत, यासाठी असलेली समिती लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली. तसेच पायथ्याशी पोलीस चौकी देखील असणे गरजेचे आहे. याशिवाय प्राथमिक उपचाराचे देखील सोय व्हावी अशी मागणी आहे.




