Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशWest Bengal Election Result : ममतांची डब्बल सेंच्चुरी, भाजप शंभरपासून दूर

West Bengal Election Result : ममतांची डब्बल सेंच्चुरी, भाजप शंभरपासून दूर

कोलकाता:

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येणार आहे. या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यांत चुरस होती. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. परंतु दुपारी १२ वाजेच्या कलानुसार भाजप अजून शंभरपासूनही दूर आहे. ममता बॅनर्जी द्विशतकाकडे वाटचाल केली

- Advertisement -

Assam Election Results आसाममध्ये भाजप परतणार ?

विधानसभेच्या २९४ जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी १४८ ही मॅजिक फिगर आहे. तो ममतांचा तृणमूल काँग्रेसने पार करत २०३ जागांवर आघाडी घेतली. भाजपला ८७ जागांवर आघाडी आहे. सुरुवातीच्या कलानुसार दोन्ही पक्षात रस्सीखेच होती. परंतु सकाळी ११ वाजेनंतर परिस्थिती बदलण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल सुरु झाली.

या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यात सर्वात चर्चेत राहिलेले राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. कारण बंगालमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपने गेल्या 5 वर्षापासून प्रचंड तयारी केली होती. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी देखील आपली सत्ता राखण्यासाठी संपूर्ण ताकद झोकली आहे आणि ममता यांना त्यात यश आले.

West Bengal Election Result 2021 : बंगालमधील सर्व जागांचे कल हाती; प्रशांत किशोर यांचा ‘तो’ दावा चर्चेत

डाव्यांना आणि काँग्रेस संपवले

भाजपाने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनाच लक्ष्य केले होते. मात्र, त्याच्या उलटा खेळ झाला असून तृणमूल संपण्याऐवजी डावे आणि काँग्रेसच संपली आहे. 2016 च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 210 जागा मिळाल्या होत्या. डाव्यांच्या आघाडीला 77 आणि भाजपाला 3 जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीतडाव्यांच्या पारड्यात 77 वरून थेट शून्य पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाने डाव्यांना आणि काँग्रेस आघाडीला संपविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या