Wednesday, April 30, 2025
Homeधुळेबाह्मणे येथे तिहेरी अपघात

बाह्मणे येथे तिहेरी अपघात

दोंडाईचा – Dondaicha – वि.प्र :

शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे ग्रामपंचायतीच्या प्रांगणासमोर रस्त्याच्या साईड पट्टयांचे काम सुरू असून याच ठिकाणी काल सायंकाळी आयशर ट्रक, ट्रॅक्टर व जेसीबीचा तिहेरी अपघात झाला. त्यात सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र टॅक्टरचे नुकसान झाले.

- Advertisement -

शिंदखेडाकडून दोंडाईच्याकडे जाणार्‍या आयशर ट्रकने (क्र. एमएच 18 बी.जी 8875) साईट पट्टया दुरुस्तीच्या काम करणार्‍या ट्रॅक्टरला (क्र. एम एच 18 बीसी 2680) जोरदार धडक दिली. यामुळे ट्रॅक्टरचे हायड्रोलिक पंप पूर्णपणे निकामी झाला.

एवढेच नव्हे तर चालक पाच फूट लांब फेकला गेल्याने जखमी झाला. सुदैवाने अपघातात जिवितहानी झाली नसली तरी ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे. यावेळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी पोकाँ छगन साळुंखे, पोना संजय जाधव यांनी धाव घेतली.

126 कोटीच्या रस्त्याचे काम करणार्‍या एका कंपनीच्या दिरंगाईचाही गावकर्‍यांना फटका बसला आहे. एवढ्या मोठ्या रक्कमेचे कंत्राट घेणार्‍या कंपनीकडून काम सुरू असतांना गावाजवळ अथवा वळणाजवळ आवश्यक असलेले सूचना आणि दिशादर्शक फलक लावणे आवश्यक होते. मात्र याबाबत कंपनीने कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नसल्याचे दिसते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामकाजाची जबाबदारी करारान्वये ज्यांच्याकडे असेल अशांवर देखील कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

बाम्हणे गावातच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईट पट्ट्यामधील माती जेसीबीद्वारे काढून ती ट्रॅक्टरमध्ये टाकण्यात येत होती. अपघात जेसीबीचे देखील नुकसान झाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : परप्रांतीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येथील एका बायपास रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत एका अल्पवयीन मुलीसोबत (वय 13) एका व्यक्तीने अश्लिल चाळे केल्याची घटना सोमवारी (28 एप्रिल) दुपारी...