Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोहदरी घाटात तिहेरी अपघात; तिघांचा मृत्यू; दोन जण जखमी

मोहदरी घाटात तिहेरी अपघात; तिघांचा मृत्यू; दोन जण जखमी

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

- Advertisement -

सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात गतिरोधकावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिककडे जाणारा कंटेनर दुभाजक तोडून दुसर्‍या बाजूला जाऊन पलटी झाल्याने सिन्नरकडे येणार्‍या पिकअपसह एका दुचाकीला त्याने धडक दिली. त्यात पिकअपमधील दोघे व एक दुचाकीचालक ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.३१) सकाळी ९ च्या सुमारास घडली.

कंटेनर (क्र. एम.एच.४६/ए.आर. २७२५) चे ब्रेक फेल झाल्याने हा कंटेनर घाटातील दुभाजक तोडून दुसर्‍या बाजूच्या रस्त्यात जाऊन कलंडला. त्याचवेळी समोरून येणार्‍या पिकअप (क्र. एम.एच.१५/जी.व्ही.७१४९)ने कंटेनरला समोरून धडक दिली. त्यात पिकअपचालक बाळू रंगनाथ व्यापारी (५०, रा. सिडको, नाशिक) व चालकाशेजारी बसलेला अवधूत रामनाथ निर्मळ (२३, रा. निर्मळ पिंप्री, ता. राहता) हे दोघे ठार झाले. कुटुंबात एकुलता एक असलेल्या अवधूतचा या अपघातात मृत्यू झाला. तर पल्सर (क्र.एम.एच.१५/सी.बी.६७९६) ही पिकअपच्या मागून सिन्नरकडे येत असताना तीही कंटेनरखाली दाबली गेली. त्यात पल्सर चालक थॉमस तथा शाजी फर्नांडो (४५, रा. जेलरोड, नाशिकरोड) हा ठार झाला. फर्नांडो हे सिन्नर येथीलच एका ऑटो गॅरेजमध्ये वाहनांना रंगकाम व डेटिंगचे काम करतात. त्यासाठी नेहमीप्रमाणे ते येत असताना या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला.

मोहदरी घाटातील रस्त्यावर बनवण्यात आलेले गतिरोधक जीवघेणे ठरत असून यापूर्वीही याच गतिरोधकांमुळे अपघात झाले आहेत. आता तर थेट तिघांनाच या अपघातात आपला जीव गमवावा लागल्याने घाटातील गतिरोधकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...