Friday, May 3, 2024
Homeनाशिकनांदगाव : बोराळे येथील शेतकऱ्यांची जीवघेणी कसरत

नांदगाव : बोराळे येथील शेतकऱ्यांची जीवघेणी कसरत

नांदगाव | Nandgoan

तालुक्यातील बोराळे या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

- Advertisement -

गावातील नदीपलीकडील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत असून नागरिकांना व शेतकऱ्यांना गिरणा नदी पात्रातून ओलांडून जावे लागत आहे. यापुर्वी नदी पात्रात अपघातात काही बैलांचा व आठ शेतकऱ्यांंचा मृत्यू झाला आहे. गिरणा नदी पात्रावर पूल व्हावा, अशी मागणी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान या गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या आसपास असून नदीच्या बाजूला १०० नागरिक राहतात. पूर्ण गावाच्या शेती चे जलसिंचनाची सोय (विहिरी) या नदीच्या पलीकडच्या बाजूला आहेत. नागरिकांना रोज नदी पात्रात पाणी उतरून शेतीकामासाठी जावे लागते.

तसेच मजूर सुद्धा रोज आपला जीव मुठीत धरून नदीच्या पात्रात उतरतात. तर वस्तीवरील शाळेतील शिक्षकांना नदी पात्रात उतरून जावे लागते. आतापर्यंत आठ शेतकरी नदी पात्रात वाहून गेले आहेत. यासाठी गिरणा नदी पात्रावर पूल व्हावा ही नागरिकांची मागणी आहे.

सदर मागणीबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नाही. लोकप्रतिनिधींनी तात्काळ पुलाबाबत सकारात्मक व्हावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

– दादाभाऊ दगा सोळुंके, शेतकरी, बोराळे

- Advertisment -

ताज्या बातम्या