Sunday, September 29, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik : उड्डाणपुलावर ट्रकचा अपघात; पाच जण जखमी

Nashik : उड्डाणपुलावर ट्रकचा अपघात; पाच जण जखमी

नवीन नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

बांधकाम साइटवरून काम संपल्यावर जात असणार्‍या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळून पलटी झाल्याने ट्रक मध्ये असलेले पाच जण किरकोळ जखमी झाल्याची घटना भुजबळ फार्म नजीक उड्डाण पुलावर रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 29) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास फुलावर भुजबळ फार्म परिसरात आयशर ट्रक क्रमांक (एम एच 15 एच एच 6606) जात असताना ट्रक चालकाचे अचानक नियंत्रण सुटले व दुभाजकावर ट्रक आदळून जागेवर पलटी झाला. यावेळी ट्रक मध्ये असलेले पाच मजूर किरकोळ जखमी झाले.

स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारार्थ समोरच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. ट्रक पलटी झाल्याने त्यामध्ये असलेले लोखंडी पाईप रस्त्यावर पसरल्याने काही वेळासाठी वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. यावेळी तात्काळ पोलीस प्रशासनाने घटनास्थळी जात क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या