Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारभरधाव ट्रकची समोरासमोर धडक : एक ठार, एक जखमी

भरधाव ट्रकची समोरासमोर धडक : एक ठार, एक जखमी

तळोदा, Taloda | ता.प्र.

भरधाव वेगातील आयशर ट्रकने (truck) समोरून येणाऱ्या ट्रकला धडक (hitting) दिल्याने ट्रक चालक (Driver) ठार (killed) तर सहचालक जखमी झाल्याची घटना अंकलेश्वर-बऱ्हाणपूरमार्गावर शिर्वे फाट्याजवळ दिं. 13 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. घटना घडताच आयशर चालक फरार झाला आहे. याबाबत तळोदा पोलिसात (Police) अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर (Ankleshwar-Barhanpur) मार्गावर दिनांक 13 रोजी सकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास आयशर ट्रक (truck) (क्रमांक MH 20-EL- 3476) भरधाव वेगाने चालवून समोरून येणाऱ्या ट्रक (क्रमांक MH 21- BH 0621) हिस धडक दिल्याने धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) ट्रक चालक श्रीराम प्रेमसिंग खोकड (वय 35 रा.इब्राहिमपूर ता. भोकरदन जि. जालना) हा मरण (Death) पावला.

या ट्रक वरील सह चालक महेश शांतीलाल पगारे ( 20, रा. इब्राहिमपूर) हा जखमी झाला आहे. याबाबत महेश शांतीलाल पगारे यांनी पोलिसात (Police) खबर दिल्यावरून तळोदा पोलीसात आयशर ट्रक चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. वनसिंग पाडवी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या