Saturday, February 7, 2026
Homeनाशिककसारा घाटात धावता ट्रक कोसळला ३०० फुट खोल दरीत; चालकाचा मृत्यू

कसारा घाटात धावता ट्रक कोसळला ३०० फुट खोल दरीत; चालकाचा मृत्यू

इगतपुरी | वार्ताहर

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कसारा घाटात ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसल्याने चालक जागीच ठार झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे…

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावर ट्रक क्रमांक MH -15 – JG -0297 मुंबईहुन नाशिककडे येत असतांना जुन्या कसारा घाटात पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कसारा घाटातील दरीत ३०० फुटावर जाऊन आदळला.

YouTube video player

या अपघातात ट्रक चालक सोमनाथ भिकाजी उशिरे (वय २३ वर्ष, रा. नाशिक) याचा मृत्यू झाला. तर गाडीचा क्लिनर तुषार शिंदे ( वय २७ ) हा गंभीर जखमी झाला असुन त्याला टोलच्या नाशिक एक्स्प्रेसवेच्या रुग्णवाहिकेनेे इगतपुरी ग्रामीण रुग्णiलयामध्ये दाखल केले.

पहाटेच्या अंधारामुळे ट्रक चालक व क्लिनर दोघांनाही शोधण्यात अडथळा येत होता. सदर अपघाताची माहिती मिळताच मुंबई एक्सप्रेसवेचे गस्त पथक रवि देहाडे त्यांचे सहकारी दीपक मावरिया,

धीरज सोनवणे, रवि दुर्गुडे, तसेच घोटी टॅब महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. के. हिरे, एन. एस. सोनवणे,

एस.पी. सावकार, एच. एम. गुजरे, पी. सी हिरे आदींनी अथक प्रयत्न करून ट्रक चालक सोमनाथ भिकाजी उशिरे व क्लिनर तुषार शिंदे यांना ३०० फुट खोल दरीतून बाहेर काढले.

ताज्या बातम्या

Nashik Politics : मोठी बातमी! शिंदे सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवीण...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik उपमहापौर पदासाठी डावलले गेल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा देण्याची घोषणा...