Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपुलाच्या खांबाला ट्रकची जोरदार धडक; चालकाचा जागीच मृत्यू

पुलाच्या खांबाला ट्रकची जोरदार धडक; चालकाचा जागीच मृत्यू

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील अमृत अंजन पुलाच्या खांबाला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली. अपघातातील ट्रक चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

YouTube video player

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंटचे ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एमएच-१२/एलटी-९७७७) भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक थेट अमृत अंजन पुलाच्या खांबाला जाऊन आदळला. या भीषण धडकेत ट्रकची केबिन पूर्णपणे चुरडली गेली. परिणामी चालकाचा चेंदामेंदा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच खंडाळा मार्ग सहायक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, रविंद्र मुदळ, पोलीस हवालदार सचिन बागल यांच्यासह देवदूत आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर व ट्रकमधून विखुरलेले सिमेंटचे ब्लॉक युद्धपातळीवर हटवण्याचे काम सुरू केले.

दरम्यान, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक दोन लेनवरून सुरळीत ठेवण्यात आली होती. या अपघाताचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...