Wednesday, January 7, 2026
Homeनगरट्रकमधून अवैधरित्या भंगार वाहतूक

ट्रकमधून अवैधरित्या भंगार वाहतूक

तालुका पोलिसांची कारवाई || 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरणगाव चौकाजवळ ट्रकमधून अवैधरित्या भंगार वाहतूक करणार्‍या एका ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे 8 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हि कारवाई बुधवारी (16 जुलै) रात्री 12.30 वाजता अरणगाव चौक येथे करण्यात आली. एका ट्रक मधून अवैधरित्या भंगारची वाहतुक केली जात असल्याची माहिती अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला सापळा रचून कारवाईचे आदेश दिले. पथकाने संशयित ट्रक पकडला. ट्रक क्रमांक एमएच 42 बीएफ 8741 या वाहनामधून सुमारे 3 लाख रूपये किमतीचे लोखंडी पत्रे व विविध प्रकारचे भंगार साहित्य आढळून आले. ट्रकची एकूण किंमत 5 लाख रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

YouTube video player

यामध्ये भंगारासह एकूण 8 लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालक अनिकेत दत्तू साबळे (वय 27, रा. आंधुनी, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अंमलदार अशोक भताने यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विचारणा केली असता त्याने ट्रकमधील भंगाराच्या मालाबाबत कोणतेही कागदपत्रे सादर केली नाहीत, तसेच मालकी हक्काचा कोणताही पुरावा देऊ शकला नाही. पोलीस अंमलदार सय्यद अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...