Tuesday, May 21, 2024
Homeनंदुरबारसुरत-नागपूर महामार्गावर १८ लाखाच्या अवैध बियरसह ट्रक जप्त

सुरत-नागपूर महामार्गावर १८ लाखाच्या अवैध बियरसह ट्रक जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

मध्यप्रदेश राज्यातुन विदेशी बिअरचे ( दारुचे ) ४४५ खोके मालट्रक मध्ये भरुन अवैधरित्या विक्री करण्यासाठी गुजरात राज्यात घेवुन जाणार्‍या ट्रकला विसरवाडी पोलीसांना महामार्गावरून पकडले असुन त्यांच्या ताब्यातुन १८ लाखाची दारू व ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांना गुप्त बातमीदार मार्फत मध्यप्रदेश कडुन गुजरात राज्यात विदेशी बिअर विना पास परमीटा शिवाय वाहतुक होत आहे . अशी माहिती मिळाल्याने त्यांनी विसरवाडीचे सपोनि नितीन पाटील यांना सांगीतले त्यांना पथकासह नागपुर -सुरत महामार्गावर महालक्ष्मी हॉटेल समोर रस्त्यावर नाकाबंदी लावुन रात्री २३.३० वाजेच्या सुमारास विदेशी बिअर भरुन वाहतुक करणार्‍या मालट्रक थांबवुन चालकांना विचापुस केली असता. त्यांनी मालट्रकमध्ये मका असल्याचे सांगीतले पोलीसांनी ताडपत्री उघडुन पाहीले असता त्यात मका गोणीचे थर आढळुन आले.

त्या गोणीच्या पलीकडे विदेशी बिअरचे खोके आढळुन आल्याने एका खोक्यातुन बिअरची बाटली काढुन पाहता सदर बिअरच्या बाटलीवर पॉवर १०००० सुपर स्टॉंग बियर फॉर सेल इन मध्यप्रदेश ओन्ली असे लिहीलेले असल्याने सदर बिअरचे परमिट बाबत विचारपुस करता त्यांच्याकडे बिअरचे कोणतेही परमिट किंवा दारुची वाहतुकीचे परवाना नसल्याचे चालकाने सांगितले. तेव्हा सदरची दारु ही फक्त मध्यप्रदेश राज्यात विक्रीसाठी असल्याने ती गैरकायदा विनापास परवाना गुजरात राज्याकडे विक्रीसाठी घेवुन जात असल्याची पंच व पोलीसांची खात्री झाल्याने हा मालट्रक पंचासमक्ष विसरवाडी पोलीस ठाण्यात आवारात आणुन मालट्रक मधील १८ लाख १ हजार रुपये किंमतीचे पॉवर १०००० सुपर स्टॉंग बियरचे एकुण ४४५ खोके, व टाटा कंपनीचा मालट्रक (क्र.एम.एच- १९,सी.वाय-२४०३) असा मुद्देमाल जप्त करुन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोल्या गावीत यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात चालक रामकृष्ण पंडीत पाटील रा.वराड ता.धरणगाव, सुनिल श्रीराम पाटील रा.बोराडी ता.शिरपुर यांच्या विरूध्द महाराष्ट्रा दारुबंदी अधिनियम कलम ६५ ( ई ),(क) स ८३, १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, यांच्या मार्गदर्शाखाली सपोनि नितीन पाटील, असई दिलीप गावीत, पोकॉ मुकेश सावळे, विशाल गावीत, नितीन सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या