Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशTurkey Syria Earthquake : चिमुकलीचे अंग धुळीनं माखलेलं, काहीशी भेदरलेली; ढिगाऱ्याखालून बाहेर...

Turkey Syria Earthquake : चिमुकलीचे अंग धुळीनं माखलेलं, काहीशी भेदरलेली; ढिगाऱ्याखालून बाहेर काढताच….

दिल्ली | Delhi

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये (Turkey Syria Earthquake) सोमवारी पहाटे ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.

- Advertisement -

या भीषण भूकंपात आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये सुमारे ५ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, २० हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. (Viral Video)

भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ढिगाऱ्याखालून जिवंत नागरिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बचाव कार्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये दोन लहान मुलाचं रेस्क्यू ऑपरेशन केल्याचं दिसतंय. (Turkey Syria Earthquake Video)

त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या कर्मचारी आणि नागरिकांनी जल्लोष करत टाळ्या वाजवल्या आहेत. या दुर्दैवी घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये हा व्हिडिओ थोडासा दिलासादायक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला

तसेच आणखी एका व्हायरल व्हिडिओमध्ये बचाव पथक एका तीन वर्षांच्या चिमुकल्याला रेस्क्यू करताना दिसत आहे. तब्बल २२ तासांनंतर एका तीन वर्षांच्या मुलाला ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.

चिमुकला सुखरुप असल्याचं पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला. चिमुकल्याचं अंग धुळीनं माखलं होतं. काहीसा भेदरलेला. पण, कोणतीही गंभीर दुखापत झालेली नव्हती.

Shraddha Murder Case : “केस अन् चेहऱ्यासाठी ब्लो टॉर्च वापरला तर, हाडे…”; श्रद्धा हत्याकांडाबाबत आफताबचा धक्कादायक खुलासा

भारतासह जगभरातून विविध देशांनी भूकंपग्रस्त देशांना मदत देऊ केली असून, तुर्कीमध्ये मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे २५ हजार जण कार्यरत असल्याची माहिती तेथील प्रशासनाने दिली. भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानातून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक (एनडीआरएफ), औषधे, कोरडे अन्नपदार्थ आणि इतर साहित्य तुर्कीला पाठविण्यात आले असून, हे विमान मंगळवारी रात्री तुर्कीतील अदाना येथे पोहोचले.

पहिल्या टप्प्यामध्ये भारतातून गेलेल्या ‘एनडीआरएफ’च्या विशेष पथकामध्ये पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. श्वान पथक, वैद्यकीय सामग्री, प्रगत ड्रिलिंग उपकरणे आणि इतर साधने पाठवण्यात आली आहेत.

“आम्ही पक्ष वाढविण्यासाठी…”; थोरातांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, कोरडे अन्नपदार्थ, औषधे, सलाइन आणि इतर सामग्री पाठविण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने भारताकडून मदत पाठविण्यात येईल.’ तुर्कीचे भारतीय राजदूत फिरात सुनेल यांनी या मदतीबद्धल भारताचे आभार मानले आहेत. ‘गरजेला मित्रच धावून येतो,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या