Thursday, May 14, 2026
Homeदेश विदेशTVK Vijay: मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; बहुमताचा आकडा पार, VCKकडून...

TVK Vijay: मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; बहुमताचा आकडा पार, VCKकडून पाठिंबा, पण…

तामिळ नाडू | Tamil Nadu
देशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूतील सत्तास्थापनेत आता अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. टीव्हीके पक्षाला व्हीसीके पक्षाने आपला पाठिंबा दिल्याने विजय यांच्या पक्षाने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर, इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षानेही टीव्हीकेचे विजय यांना पाठिंबा दिल्यामुळे आता विजय यांचे संख्याबळ १२० वर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे थलापथी विजयला तामिळनाडूत सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून मुख्यमंत्रीपदाचाही मार्ग मोकळा झाला आहे.

थलापती विजय आता तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस सोबतच सीपीआय, सीपीआयएम यांच्या दोन-दोन आमदारांनी विजय यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे टीव्हीकेला ११६ आमदारांचा पाठिंबा जाहीर झाला. यानंतर सर्वांचं लक्ष व्हीसीकेकडे लागलं होते. अखेर आज व्हीसीकेने विजय यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर टीव्हीकेचे नेते अर्जुन यांनी पाठिंबा देणार्‍या सगळ्या पक्षांचे आभार मानले.

- Advertisement -

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसैनिकांचा हल्ला; शाईफेकनंतर सुपाऱ्याही फेकल्या

आता TVK चे शिष्टमंडळ आज 9 मे सायंकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसने TVK ला पाठिंबा देताना अट घातली आहे की कोणत्याही जातीयवादी शक्तींना आघाडीत स्थान दिले जाणार नाही.

व्हिसीकेकडून अटी
व्हीसीके म्हणजेच विदुथलाई चिरुथैगल काची यांनी टीव्हीकेसमोर काही अटी ठेवल्या आहेत. व्हीसीकेने दोन जागा जिंकल्या असून त्यांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्यास बहुमताचा ११८ चा आकडा गाठता येणार आहे. व्हीसीकेला दोन जागांवर यश मिळाले, ज्यामध्ये केवन्नी अरसु आणि एल. ई. जोथिमनी निवडून आले. विजय यांना बहुमत नसल्याने व्हीसीकेच्या आमदारांचा भाव वाढल्याची चर्चा असून व्हीसीकेकडून त्यांच्यापुढे ४ मागण्या केल्या आहेत. विजय यांच्या मंत्रिमंडळात त्यांना उपमुख्यमंत्रिपद हवे असून कॅबिनेट मंत्रि‍पदाची मागणीदेखील करण्यात आली आहे. व्हीसीकेच्या या दोन प्रमुख मागण्या आहेत.

तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्याच निवडणुकीत करिश्मा करुन दाखवला. विधानसभा निवडणुकीत तब्बल १०८ जागा जिंकत टीव्हीके बहुमताच्या काठावर येऊन पोहोचली आहे. मात्र, सत्ता स्थापनेसाठी त्यांना ११८ बहुमताचे संख्याबळ कमी पडत असल्याने काँग्रेससह इतर पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. त्यातच, आता थोल थिरुमावलवन यांची पार्टी असलेल्या विदुथलाई चिरुथाइगल काची (व्हिसीके) पक्षाने थलपती विजय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. व्हिसीके पक्षाकडे २ आमदार आहेत, या आमदारांसह विजय यांच्या पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला.

तामिळनाडूतील पक्षीय बलाबल – एकूण 234

TVK (विजय) – 108
DMK – 59
AIADMK – 47
काँग्रेस – 5
PMK – 4
मुस्लिम लिग – 2
कम्युनिस्ट पक्ष – 2
VCK – 2
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी – 2

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...