Saturday, May 9, 2026
Homeमहाराष्ट्रGunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसैनिकांचा हल्ला; शाईफेकनंतर सुपाऱ्याही फेकल्या

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसैनिकांचा हल्ला; शाईफेकनंतर सुपाऱ्याही फेकल्या

जालना । Jalana

राजकीय वर्तुळात आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या जालना दौऱ्यात आज मोठा राडा झाला. जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या ताफ्यावर जोरदार शाईफेक करत सुपारी भिरकावली. विशेष म्हणजे, ज्या गाडीवर हा हल्ला झाला, त्यात सदावर्ते यांच्या पत्नी आणि दोन लहान मुली देखील उपस्थित होत्या. या घटनेमुळे शहरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते हे आज शनिवारी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जालना दौऱ्यावर आले होते. त्यांचा ताफा जालना शहरातील विशाल कॉर्नर भागातून जात असताना, आधीच दबा धरून बसलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अचानक त्यांच्या गाडीला घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या गाडीवर काळी शाई तसेच सुपारी फेकली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गाडीच्या काचांवर शाई पडल्याने चालकाला गाडी थांबवावी लागली. सदावर्ते यांच्या कुटुंबातील सदस्य सोबत असताना अशा प्रकारे झालेल्या हल्ल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रिक्षाचालकांच्या ‘मराठी विरुद्ध अमराठी’ वादावरून वातावरण तापलेले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. या टिकेचा वचपा काढण्यासाठी मनसे सैनिक आक्रमक झाले होते. “राज ठाकरेंवर केलेली टीका सहन केली जाणार नाही,” असा इशारा मनसेकडून देण्यात आला होता आणि आज जालन्यात त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले.

घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या शाईफेक प्रकरणात मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह पाच ते सहा पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी रत्नपारखे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी संताप व्यक्त केला आहे. “लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, जेव्हा कुटुंबातील महिला आणि मुले सोबत असताना असे भ्याड हल्ले होतात, तेव्हा ती विकृती ठरते,” अशा शब्दांत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. सध्या जालना शहरात प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, या घटनेचे राजकीय पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

बहुमताचा

TVK Vijay: मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; बहुमताचा आकडा पार,...

0
तामिळ नाडू | Tamil Naduदेशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूतील सत्तास्थापनेत आता अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. टीव्हीके पक्षाला व्हीसीके पक्षाने...