Friday, January 23, 2026
Homeमुख्य बातम्याजळगावात महायुतीच्या बारा जागा बिनविरोध

जळगावात महायुतीच्या बारा जागा बिनविरोध

आ.सुरेश भोळेंचे चिरंजीव व आ.चंद्रकात सोनवणेंच्या मुलासह पुतण्याचा समावेश

- Advertisement -

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

YouTube video player

आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असताना भाजप-शिवसेना महायुतीने बारा जागा बिनविरोध निवडून आणत धडाक्यात प्रारंभ केला आहे.यात आ.सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांचा चिरंजीव तसेच शित्तसेनेचे आ.चंद्रकात सोनवणे यांच्यामुलासह पुतण्याचा समावेश आहे.

जळगाव महापालिकेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती आहे. तिन्ही पक्ष एकत्रीतपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच प्रभाग क्रमांक- 12 ब मधून भाजपच्या उज्वला बेंडाळे यांच्या विरोधातील अर्ज बाद झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात झाली. काल माघारीच्या दिवशी सकाळी प्रभाग क्रमांक-18 मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

यानंतर शिवसेनेचेच मनोज सुरेश चौधरी आणि प्रतिभा गजानन देशमुख हे उमेदवार प्रभाग क्रमांक-आठ मधून बिनविरोध निवडून आले. आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सकाळीच सागर शाम सोनवणे हे शिवसेनेचे उमेदवार प्रभाग क्रमांक-दोनमधून बिनविरोध झाले. यानंतर भाजपचे उमेदवार तथा आ. राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे हे प्रभाग क्रमांक 7-अ मधून विरोधी उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडून आले. याच प्रभागातील भाजपच्या उमेदवार दीपमाला काळे यांची देखील बिनविरोध निवडून आले.

प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपचे डॉ. विरन खडके यांच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे. यानंतर शेवटच्या क्षणांमध्ये प्रभाक क्रमांक 13 मधून वैशाली अमित पाटील यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची देखील बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे.

तर प्रभाग क्रमांक 7-ब मधून अंकिता पंकज पाटील यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, अर्ज मागे घेण्याची मुदत अंतिम टप्प्यात असतांनाच प्रभाग क्रमांक 19-अ मधून शिवसेनेचे विक्रम उर्फ गणेश सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे त्यांची देखील बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...