Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजप्रदिप पुर्णेकरांवर गोळ्या झाडणारा आणि कोयत्याने वार करणारे दोन आरोपी अटकेत; पोलिसांनी...

प्रदिप पुर्णेकरांवर गोळ्या झाडणारा आणि कोयत्याने वार करणारे दोन आरोपी अटकेत; पोलिसांनी असा काढला माग?

ठाणे | Thane
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करणारा निखिल यादव आणि धारदार शस्त्राने हल्ला करणारा नितेश पवार उर्फ भावड्या या दोघांना पोलिसांनी अलिबागजवळून अटक केली आहे. दोघेही पोलिसांपासून बचाव करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या दिशेने पसार झाले होते. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अलिबाग परिसरातील एका डेअरीत छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.

या दोघांच्या अटकेनंतर पूर्णेकर हत्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. यापूर्वी पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि आणखी एक आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला निखिल यादव हा प्रदीप पूर्णेकर यांच्या ऑफिसच्या बाजूला वडापावाच्या गाडीवर काम करायचा, अशी माहिती आहे तर नितेश पवार हा सराईत गुन्हेगार आहे.

- Advertisement -

सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचं सामान्य माणसाचं सामर्थ्य! गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची एकूण नऊ पथके तयार करण्यात आली होती. यापैकी पप्या शिंदे याला पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले होते. तर आता निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रदीप पूर्णेकर यांची प्रत्यक्ष हत्या करणाऱ्यांमध्ये पाच मुख्य आरोपींचा समावेश आहे. यापैकी पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार हे तीनजण आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. तर संतोष कनोजिया उर्फ टल्ली अजूनही फरार आहे. तर एक मारेकरी हा हेल्मेट घालून असल्यामुळे त्याची ओळख पटली नव्हती. मात्र, आता नितेश पवार आणि निखिल यादव यांच्या चौकशीतून त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते.

पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी निखिल यादव हा पूर्णेकर यांच्या कार्यालयाशेजारीच असलेल्या एका वडापावच्या गाडीवर काम करायचा. पूर्णेकरांवर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्याचे काम याच निखिलने केले होते. तर, दुसरा आरोपी नितेश पवार ऊर्फ भावड्या याने पूर्णेकर यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले होते. नितेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या

पुरस्कार

Nashik News: मोखाड्यातील श्रद्धा शृंगारपुरेंना डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर

0
नाशिक | प्रतिनिधीनीलवसंत मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरतर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार 2026 पालघर जिल्ह्यातील मोखाड्यासारख्या अतिदुर्गम...