Wednesday, March 26, 2025
Homeधुळेधुळ्यात अडीच किलो गांजा, गावठी पिस्टल, काडतुसे पकडले

धुळ्यात अडीच किलो गांजा, गावठी पिस्टल, काडतुसे पकडले

धुळे । Dhule। प्रतिनिधी

मुंबई-आग्रा (Mumbai-Agra) महामार्गावर (Highway) टोल नाक्यानजीक मोहाडी पोलिसांच्या (police) पथकाने अडीच किलो गांजा, (cannabis) गावठी पिस्टल, (pistol) एक जीवंत काडतूस, चाकू व वाहन असा तीन लाख 82 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seizure of property) करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

महाशिवरात्रीनिमित्त मुंंबई-आग्रा महामार्गावरुन अंमली पदार्थांची (drugs) वाहतूक होण्याची शक्य असल्यामुळे मोहाडी पोलिसांचे (Mohadi Police) पथक महामार्गावर दरिया हॉटेलजवळ थांबून वाहनांची तपासणी (Checking) करीत होते. त्यावेळी धुळ्याकडून मुंबईकडे हुड नसलेली केशरी रंगाची ओपन जीप (क्र. एमएच 16-7151) संशयितरित्या जातांना आढळून आली. त्यामुळे पोनि शिंदे यांनी जीपला थांबण्याचा इशारा दिला. परंतू जीप न थांबवता पुढे नेण्यात आली. त्यामुळे टोलनाक्याजवळ (Tolanaka) जीपला पथकाने थांबविली.

जीप चालक नदीम मोहम्मद शमीम सिद्दीकी (वय32) रा. नवी मुंबई, अस्लमखान अलीयारखान पठाण (वय40) रा. मध्यप्रदेश या दोघांना पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले व वाहनाची तपासणी केली असता त्यात 17 हजार 500 रुपये किंमतीचा अडीच किलो गांजा(cannabis), 15 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल,(pistol) 200 रुपये किंमतीचे एक जीवंत काडतूस (Cartridge), ट्रॅव्हलींग बॅग, 200 रुपये किंमतीचा चाकू असा तीन लाख 50 हजारांचा मुद्देमाल तेथे आढळून आला. वाहनासह मुद्देमाल असा तीन लाख 82 हजार 900 रुपयांचा जप्त करण्यात आला.

याबाबत पोकॉ मुकेश नानाभाऊ मोरे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन एनडीपीएस अ‍ॅक्ट 1985 ची कलम 8 (1), 20 (ब) (खख) (ब) 29 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस निरिक्षक दत्तात्रय शिंदे, असई अशोक पायमुडे, पोना किरण कोठावदे, पोकॉ प्रकाश जाधव, मुकेश मोरे, चेतन माळी, हेकॉ शाम काळे, प्रभाकर ब्राम्हणे, राहूल पाटील, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, धिरज गवते, राहूल गुंजाळ, जय चौधरी यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshumukh Case: “आडवे आले तर कायमचा धडा शिकवा”; संतोष देशमुख...

0
बीड | Beedसंतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहिले. उज्वल निकम हे...