धुळे । प्रतिनिधी ।
शहरातील चितोड रोड परिसरात असलेल्या क्रांती चौकजवळ अमेझॉन कुरिअर सेंटर फोडून अज्ञात चोरट्यानी अडीच लाख रुपये लांबविले आहेत. मध्यरात्री दरवाजाची कडी कुलूप तोडून ऑफिसमधील कपाटात ठेवलेली अडीच लाखाची रक्कम लांबीविली.
- Advertisement -
शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी सकाळी फौज फाट्यासह याठिकाणी भेट दिली. नंतर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले.