Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik Crime News : गाय चोरणारे दोघे जेरबंद

Nashik Crime News : गाय चोरणारे दोघे जेरबंद

वावी | वार्ताहर | Vavi

गेल्या काही दिवसांपासून वावी पोलीस ठाणे (Vavi Police Station) हद्दीत गाय (Cow) चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. मात्र, त्याचा छडा लागत नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना गोपालन व्यवसाय करणे मोठे अवघड झाले होते. आपल्या राहत्या घरासमोरून गाय चोरी जात असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. या गाय चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर (Police) चोरांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले होते…

- Advertisement -

मात्र, शेतकऱ्यांचा महत्वाचा मुद्दा उचलत पोलिसांचे गुप्त बातमीदारांच्यामार्फत गेल्या दोन महिन्यांपासून सुगाव लावण्याचे काम सुरू होते. या दरम्यान वावी येथे सुरू असलेल्या दशावतार कार्यक्रमात हा असा प्रकार हे चोरटे (Thieves) करतील असा संशय वावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांना आला होता. त्यानंतर पोलीस हवालदार देविदास माळी व शैलेश शेलार यांच्यामार्फत लोखंडे यांनी तपासाची चक्रे फिरवत दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे.

Nashik Crime News : औषधे घेऊन जाणाऱ्या कंटेनरमधील बॉक्सवर चोरट्यांचा डल्ला

वावी येथील पुनम घेगडमल यांच्या फिर्यादीनुसार वावीजवळ टोलनाक्यानजीक घेगडमल यांच्या वस्तीवरून या चोरट्यांनी रात्री ११ ते २ दरम्यान घरी कोणी नसल्याचा फायदा घेत दोन गाय चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार सदर गाय कोणी चोरल्या याची माहिती मिळताच पोलिसांनी आपले चक्र गतीने फिरवत पिंपरवाडी येथील संतोष जगन्नाथ ब्राह्मणे (वय २९) व वावी येथील मुस्तफा सलीम शेख (वय १९) या दोन संशयित आरोपींना (Accused) ताब्यात घेतले.

त्यानंतर या दोघा संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदर गाय लोणी येथील जनावरांच्या बाजारात विकल्याचे सांगितले. यानंतर याप्रकरणी संशयित आरोपींवर ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणाचा अधिक तपास वावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर व पो.ह. देविदास माळी, शैलेश शेलार हे करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

विशेष संवाद कट्टा : स्वातंत्र्याच्या कविता आणि आपण

- Advertisment -

ताज्या बातम्या