Saturday, May 18, 2024
Homeधुळेमहाविद्यालयीन तरुण-तरुणीला लुटणारे दोघे जेरबंद

महाविद्यालयीन तरुण-तरुणीला लुटणारे दोघे जेरबंद

धुळे – प्रतिनिधी dhule

तालुक्यातील गोंदूर शिवारात महाविद्यालयीन तरुण-तरुणीचा मोबाईल (Mobile) लुटीच्या गुन्ह्याची पश्चिम देवपूर पोलिसांनी (police) उकल केली असून या प्रकरणी दोघांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन मोबाईलसह गुन्ह्यासाठी वापरलेला चाकू आणि दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

दोन दिवस धोक्याचे ; राज्यभर पावसाचा अंदाज, गारपिटीची शक्यतावयोवृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी याचिका

चार दिवसांपूर्वीच हा गुन्हा घडला होता. चारूदत्त अनिल जोशी (वय 22 रा.आर्या हॉटेलजवळ, स्टेशन रोडसमोर ता.परळी जि.बीड व ह.मु जे.के.ठाकरे हॉस्पिटलजवळ, विद्याविहार कॉलनी, धुळे) हा तरूण मंगळवार दि 11 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मोराणे ते गोंदूर बायपासरोडवर गोंदूर शिवारातील निकम पॉलीटेक्नीकच्या पुढे सपना पोट्री फॉर्मच्या बोर्डाजवळ मैत्रीणीसोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी दुचाकीवरुन दोन जण जवळ आले. दोघांनी चाकूचा धाक दाखवून चारुदत्त जोशी आणि त्याच्या मैत्रीणीकडील १२ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जबरीने हिसकावून नेले. याप्रकरणी चारुदत्त जोशी याने पश्‍चिम देवपुर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सेवा नियमातील बदलाचा १० हजार अभियंत्यांना फटका

देवपूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. फिर्यादी चारुदत्त जोशी याने लुटारुंचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्यावरुन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयीतांचा शोध सुरु केला. गोपनिय माहितीच्या आधारे हा गुन्हा देवेंद्र एकनाथ भिल (रा.आनंदखेड ता.धुळे) आणि अजय रुपा सोनवणे ( रा.आर्वी ता.धुळे) या दोघांनी केल्याचे समजल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून हिसकावलेले १२ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चाकुही हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधिक्षक किशोर काळे, पोलीस उप अधीक्षक (गृह) संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम देवपुर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोसई एम.एच.सैय्यद, असई प्रविण अमृतकर, किरण जगताप, हे.कॉ.पुरुषोत्तम सोनवणे,पोना धर्मेंद्र मोहिते,पो.कॉ.सुनिल राठोड, पोकॉ निलेश हलोरे, एएसआय रविंद्र हिरे यांच्या पथकाने कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या