Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशपॅसेंजर ट्रेनला भीषण आग; दोन डब्यांसह इंजिन जळून खाक

पॅसेंजर ट्रेनला भीषण आग; दोन डब्यांसह इंजिन जळून खाक

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

उत्तरप्रदेशातील (Uttarpradesh) सहारनपूरहून (Saharanpur) दिल्लीला (Delhi) जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला (Passenger train) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. मेरठमधील दौराला स्टेशनवर (Daurala Station) ही आग लागल्याचे समजते…

- Advertisement -

या आगीत रेल्वेच्या इंजिनसह दोन डबे जाणून खाक झाले आहेत. ट्रेनचा ब्रेक जाम झाल्यामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. ट्रेन दौराला स्टेशनवर पोहोचली असता इंजिनच्या खालच्या भागात आग लागली. प्रवाशांना आगीच्या ठिणग्या निघताना दिसल्याने प्रवासी ट्रेनमधून बाहेर पळाले. यामुळे स्टेशनवर एकच खळबळ उडाली होती.

काही वेळातच ट्रेनमध्ये लागलेल्या आगीला भीषण रूप प्राप्त झाले. याबाबत रेल्वे प्रशासनाने अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल (Fire Brigade) घटनास्थळी दाखल होईपर्यंत इंजिनसह दोन डब्यात आग पसरली होती.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आग इतकी भीषण होती की, काही क्षणात दोन्ही डबे जाऊन खाक झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या