Thursday, September 19, 2024
Homeराजकीयकाँग्रेसचे 'हे' दोन आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

काँग्रेसचे ‘हे’ दोन आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुक (Vidhansabha Election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच विरोधी पक्षातील अनेक आमदार (MLA) उमेदवारीसाठी सत्ताधाऱ्यांकडे फिल्डिंग लावतांना दिसत आहेत. अशातच आता विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेल्या काँग्रेसच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) काल (दि.१३) रोजी रात्री वर्षा या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली असून ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा झडत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा : “एकनाथ शिंदे हे सर्वात लोचट मुख्यमंत्री”; संजय राऊतांची घणाघाती टीका

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि नांदेडमधील देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आगामी काळात हे दोन्ही आमदार काँग्रेस सोडणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

हे देखील वाचा : नाशिक कृउबा समितीच्या उपसभापतीपदी माळेकर बिनविरोध

दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीत (Vidhanparishad Election) क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर (MLA) काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार, अशी चर्चा सुरुवातीला होती. या आमदारांना पक्षातून बाहेर काढले जाईल, असेही सांगितले जात होते. मात्र, आता काँग्रेस हायकमांडने क्रॉस व्होटिंग करुन पक्षासोबत बेईमानी करणाऱ्या या आमदारांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये, असा आदेश दिल्याची चर्चा आहे.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात पावसाची उघडझाप; गंगापूर धरणातील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली असली तरी या दोन्ही आमदारांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात बोलतांना खोसकर म्हणाले की, “मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून मी काँग्रेससोबत (Congress) होतो आणि आगामी काळातही काँग्रेससोबतच राहणार आहे. मला पक्षाकडून उमेदवारी मिळणार आहे”, असा दावा त्यांनी केला आहे. तर जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) म्हणाले की, “मी ई-पिक पाहणी अहवालासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आमच्याकडे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मला मुख्यमंत्री यांनी वेळ दिली होती, त्यामुळे मी भेट घेतली. यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही”, असे स्पष्टीकरण अंतापूरकर यांनी दिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या