Saturday, May 18, 2024
HomeमनोरंजनLata Mangeshkar : लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

मुंबई | Mumbai

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले (Lata Mangeshkar Passed Away) आहे. त्या ९२ वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी ( Breach Candy Hospital Mumbai ) रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.

- Advertisement -

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून श्रद्धांजली व्यक्त केली जाते आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनांतर आता देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

लता मंगेशकर यांना ९ जानेवारील करोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. ३० जानेवारीला लता मंगेशकर कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, काल अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या