Friday, May 3, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवस पावसाचे

औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवस पावसाचे

औरंगाबाद – aurangabad

नवरात्रात (Navratri) चार दिवस जोरदार हजेरी लावल्यानंतर गायब झालेला पाऊस (rain) गुरुवारी परतला. शहर परिसरात काही ठिकाणी हलका तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. या पावसाची चिकलठाणा येथील वेधशाळेत ११.८ मिलिमिटर एवढी नोंद झाली आहे.

- Advertisement -

देवीच्या पहिल्या माळेसोबत पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे दसऱ्यापर्यंत म्हणजेच संपूर्ण नवरात्रात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्‍त केला जात होता, पण पाऊस आठ दिवसापासून गायब होता. दरम्यान बुधवारपासून शहर परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते. गुरुवारी पहाटे हलका पाऊस झाला. त्यानंतर सकाळी काही काळ सूर्यदर्शनही झाले. पण दुपारनंतर रिमझिम पावसाला सुरवात झाली. सिडको-हडको भागात पावसाचा जोर जास्त होता.

पूर्व आशियातील मुरू चक्रीवादळाचा हा परिणाम असून, ९ ऑक्टोबरपर्यंत त्याची तीव्रता राहणार आहे. त्यामुळे पावसाचे आगमन झाल्याचे हवामान अभ्यासक सांगत आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे वार्षिक सरासरी (३० सप्टेंबर पर्यंतचे) पर्जन्यमान ५८१.७ मिमी आहे. या तुलनेत आतापर्यंत ६६४ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत ५९२ मिमी पाऊस आजवर होणे अपेक्षित होते. ११२ टक्के हा पाऊस आहे. शहरात ११.२ मिमी गुरुवारी दिवसभरात शहर व परिसरात ११.१ मिमी पावसाची नोंद झाली.

सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. त्यानंतर पूर्ण शहरात हलक्या, मध्यम व नंतर जोरदार सरी बरसल्या. सकाळपासून वातावरणात दमटपणा होता. दुपारनंतर वातावरण बदलले आणि पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. हर्सूल, बंबाटनगर, राजनगर-मुकुंदवाडी, सातारा-देवळाईतील रस्ते नसलेल्या भागात चिखल झाला. नागरिकांना चिखलातून वाट काढत घरापर्यंत जावे लागले.

- Advertisment -

ताज्या बातम्या