Monday, June 17, 2024
Homeजळगावपुलाच्या भितींवर मोटरसायकल आदळल्याने दोघांचा मृत्यु

पुलाच्या भितींवर मोटरसायकल आदळल्याने दोघांचा मृत्यु

वरणगाव, Varangaon ता.भुसावळ । वार्ताहर

- Advertisement -

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोहुरखेडा फाट्यावर दोन तरूण भरधाव वेगात मोटरसायकल चालवून पुलाच्या (bridge) भिंतीवर मोटरसायकल (motorcycle hit) आदळल्याने एक तरुण जागीच ठार तर दुसरा उपचारादरम्यान मयत झाल्याची घटना दुपारी घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुरज रामदास (वय 15, रा.काहुरखेडा), सुनिल विठ्ठल भालेराव (वय 20, रा. वघारी ता. जामनेर) हे दोघे तीन वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्र. एमएच 19 डी 1600 वरुन काहुरखेडा फाट्यावर भरधाव वेगात मोटरसायकल चालवत असतांना महामार्गावरील भिंतीवर मोटरसायकल आदळल्याने सुरज यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने हा जागीच ठार झाला तर सुनिल याच्या मानेला जबर मार लागल्याने याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत वरणगाव पोलिसात पो.पा. साहेबराव शांताराम पाटील यांच्या खबरदारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पीएसआय किशोर पाटील, हे.काँ. विजू बावीस्कर करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या