Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्यावेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

रस्ते अपघातात (Road accident) नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. अशातच वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जण ठार झाल्याची माहिती पोलीसांनी (Police) दिली. एक घटना पंचवटी पोलीस ठाणे (Panchvati Police Station) हद्दीत तर, दुसरी घटना सातपूर पोलीस ठाणे हद्दीत घडली. दोन्ही संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये याची नोंद करण्यात आली आहे.

पंचवटी परिसरातील मेरी लिंक रोड येथे एक अपघात घडला. याबाबत गणेश सुरेश माळवाळ (Ganesh Suresh Malwal) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पराग नरेंद्र जोशी (वय ३८, रा. पंचवटी) हे त्यांच्या एमएच १२ एनयू ८३६९ या क्रमांकाच्या आयटेन कारने मेरी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्स (Audumber Lawns) जवळून जात होते. त्यावेळी सिमेंटच्या कट्ट्याला जबर धडक दिल्याने पराग जोशी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताचा दुसरा प्रकार गंगापूर रोडजवळ घडला. सलिम सत्तार खाटीक (Salim Sattar Khatik) (वय ५३, रा. सातपूर) हे काल सायंकाळच्या सुमारास मोटारसायकलीने डबलसीट सावरगाव-गोवर्धन लिंक रोडने अशोकनगर (Ashoknagar) येथे घरी जात होते. त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या एमएच १५ एचजी २३४८ या क्रमांकाच्या कारने त्यांना धडक दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्यात खाटीक यांच्या डोक्याला जबर मार लागला, त्यांना त्यांचे चुलतभाऊ हारुन सरफोद्दीन खाटीक (Harun Sarfoddin Khatik) यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospitals) दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या