Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Suicide News : एकाच दिवशी दोन मुलींची आत्महत्या; कारणे अस्पष्ट

Nashik Suicide News : एकाच दिवशी दोन मुलींची आत्महत्या; कारणे अस्पष्ट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंधरा ते सोळा वयोगटातील दोन विद्यार्थिनींनी एकाच दिवशी गळफास (Hanging) घेत जीवन संपविल्याच्या घटना देवळाली कँम्प पोलिसांच्या (Deolali Camp Police) हद्दीत घडली आहे. या मुलींची आत्महत्या (Suicide) करण्यामागील कारणे समोर आली नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूच्या नोंदीन्वये तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘आयटीआय’ मध्ये १९ लाखांचा घोटाळा

याबाबत अधिक माहिती अशी की, अनुष्का सुरेश निसाळ (वय १५, रा. श्रीमंत होम्स, मातोश्री लान्ससमोर, विजयनगर, देवळाली) आणि हर्षदा संजय माडे (वय १५, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, लहवितगाव, नाशिक) अशी दोघा मृत मुलींची नावे आहेत. या घटनांनी देवळाली कँम्प परिसरात खळबळ उडाली असून गुरुवारी दोघींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे देखील वाचा : Nashik News : शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या; मंत्री भुसेंचे कृषी विभागाला निर्देश

पोलिसांच्या माहितीनुसार, अनुष्का ही केंद्रीय विद्यालयातून दहावी इयत्ता उत्तीर्ण झाली होती. तिचे वडील सैन्य दलातून निवृत्त झाले असून कौटुंबिक स्थिती सामान्य आहे. दरम्यान, तिने बुधवारी(दि. १२) दुपारी पावणेएक वाजता घरी असताना, काहीतरी कारणातून गळफास घेतला. काही वेळाने ही घटना समजताच तिचे मामा भाऊसाहेब आडके यांनी तिला देवळाली कँन्टोन्मेंट रुग्णालयात (Hospital) दाखल केले असता, तिला डॉ. रुपाली राठोड यांनी तपासून मृत घोषित केले. तर, हर्षदा ही देखिल जनता विद्यालयाची दहावीतील विद्यार्थिनी होती. तिचे कुटुंब मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

दरम्यान, हर्षदा हिने गुरुवारी रात्री सव्वासात वाजता घरी असतांना काहीतरी कारणातून गळफास घेतला. घटना लक्षात येतात, वडील संजय माडे यांनी तिला कँन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. रुपाली यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनांचा तपास हवालदार राजेंद्र गुंजाळ करत आहेत. दोन्ही घटनांनंतर देवळाली कँम्प पोलिसांनी (Police) मृत मुलींच्या नातलगांकडे प्राथमिक चौकशी केली. मात्र, त्यातून काही माहिती समोर आली नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....