नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR
- Advertisement -
काठीचा राऊतपाडा ता.अक्कलकुवा येथे आज दुपारी १ वाजेच्या सुमारास गुरांना पाणी (water the cattle) पाजण्यासाठी तलावात (lake) गेलेल्या दोन बालिकांचा (two girls) पाण्यात (drowning) बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी १ वाजेच्या सुमारास काठीचा राऊतपाडा ता.अक्कलकुवा येथील तलावात दोन बालिका गुरांना चारण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला.
भुमिका गुलाबसिंग वळवी (वय ९) व अंकिता दामज्या राऊत (वय ७) दोन्ही रा.काठीचा राऊतपाडा असे या मयत बालिकांची नावे आहेत. याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.