Monday, July 1, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Trimbakeshwar News : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

Nashik Trimbakeshwar News : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

- Advertisement -

येथील नील पर्वत डोंगराच्या पायथ्याच्या पाठीमागे असणाऱ्या बिल्व तिर्थ तलावावर (Bilva Tirtha leak) कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा (Girl) तलावात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे त्र्यंबकसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तनुजा युवराज कोरडे (वय १३) आणि अर्चना बाळू धनगर (वय १३) असे मृत्यू झालेल्या दोन्ही मुलींची नावे आहेत. या दोघी जणी बिल्व तिर्थ तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या असता कपडे धुतांना पाय घसरून अर्चना पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तनुजा गेली असता ती देखील पाण्यात (Water) बुडाली. यावेळी मुली कपडे धुतांना दिसत नसल्याने परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली.

त्यानंतर तलावातून मुलींना बाहेर काढले, मात्र तो पर्यंत दोघींचा मृत्यू झाला होता. यानंतर दोघींनाही त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉ. वरपे यांनी दोघींना तपासून मृत घोषित केले. यावेळी रुग्णालय परिसरात नागरिकांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या घटनेचा पुढील तपास त्र्यंबकचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गवळी व साळवे करत आहेत.

दरम्यान, यापूर्वी देखील बिल्व तीर्थवर अपघाती मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने या तलावाकडे योग्य ती प्रतिबंधक उपाययोजना करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास कोरडे यांनी केली आहे. तर सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये दोन दिवसाआड पाणी (Water) येत असल्याने येथील लोकांना पुरेसे पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. त्यामुळे पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही मग वापरण्यासाठी कुठून आणणार? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.


- Advertisment -

ताज्या बातम्या