Friday, May 17, 2024
Homeधुळेखलाणे येथे दोन घरांना आग; 16 क्विंटल कापसासह संसारोपयोगी साहित्य जळून...

खलाणे येथे दोन घरांना आग; 16 क्विंटल कापसासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

दोंडाईचा (Dondaicha) श.प्र /

शिंदखेडा तालुक्यातील खलाणे (Khalane) येथे दोन घरानां आग (Two houses on fire) लागल्याची घटना घडली. यात शेतातून काढलेला 16 क्विंटल कापसासह (cotton) रोकड (cash) व संसारोपयोगी साहित्य (household items) जळून खाक (Burnt ashes) झाले. दोन्ही घराचं एकूण सहा लाखांचे नुकसान (Loss of six lakhs) झाले आहे.

- Advertisement -

खलाणे येथील नितीन साहेबराव वानखेडे व यशवंत आत्माराम वानखेडे यांच्या घरांना अचानक भिषण आग लागल्याची घटना 22 रोजी दुपारी अकरा वाजेच्या सुमारास घडली. या आगीत नितीन वानखेडे यांच्या घरातील शेतातून काढून आणलेला दहा क्विंटल कापूस, 30 हजार रुपये रोख ,संसारोपयोगी साहित्य, राहत्या घराचे लाकूड जळून असे एकूण दोन लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

तर यशवंत वानखडे यांच्या घरातील 6 क्विंटल कापूस, 45 हजार रुपये रोख, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यांचे दोन लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा केला आहे. शासन स्थरावरून त्यांना मदत मिळण्याची मागणी होत येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या