चांदवड | प्रतिनिधी | Chandwad
तालुक्यातील एका गावातील (Village) दोन मुली शाळेत (School) जात असताना बेपत्ता झाल्याची खबर (दि. २० ऑगस्ट) रोजी मुलींच्या परिवारातील सदस्यांनी चांदवड पोलीस ठाण्यास कळविली होती. त्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी (Police) या मुलींचा शोध घेतला असता त्या सुखरूप सापडल्या असून त्यांना कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पंचवटीत पोलिस पुत्राचा निर्घृणपणे खून
याबाबत चांदवड पोलीस ठाण्याचे (Chandwad Police Station) पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शाळकरी मुली या गेल्या तीन ते चार दिवसापासून शाळेत गेलेल्या नव्हत्या. त्यामुळे शिक्षक बोलतील व रागवतील या भीतीपोटी या दोन्ही मुलींनी चांदवड बसस्थानक (Chandwad Bus Stand) येथे येऊन नाशिककडे जाणाऱ्या बसमध्ये बसून नाशिककडे निघून गेल्या होत्या.
हे देखील वाचा : Nashik Sinnar News : साडेचार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपी ताब्यात
यानंतर त्यांना रात्री उशिर झाल्याने परत येण्यासाठी कुठलेही वाहन किंवा बस (Bus) उपलब्ध न झाल्याने त्या नाशिक बसस्थानकावर (Nashik Bus Stand) रात्रभर थांबून सकाळी आठ वाजता चांदवडकडे येणाऱ्या बसमध्ये बसून चांदवड बसस्थानकावर उतरल्या. त्याठिकाणी पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.
हे देखील वाचा : Badlapur School Case : मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर आरोप; म्हणाले, “बदलापूरचे आंदोलन हे राजकीय दृष्ट्या…”
त्यानंतर चांदवड पोलिसांनी (Chandwad Police) त्यांची विचारपूस करत जबाब नोंदवत वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या परिवाराकडे दोन्ही मुलींना (Girls) सुखरूप परत केले. तसेच त्यांच्यासोबत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. याप्रसंगी गावातील नागरिक, उपविभागीय पोलिस अधिकारी,पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा