Wednesday, June 26, 2024
Homeक्राईमसंशयावरून नेवाशाच्या दोघांना मारहाण

संशयावरून नेवाशाच्या दोघांना मारहाण

पांढरीपुलावरील घटना || 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

कत्तलीसाठी वासरे घेऊन जात असल्याच्या संशयावरून दोघांना लाकडी दांडके, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करून जखमी केले. साहील रौफ शेख (वय 22 रा. चांदा ता. नेवासा) व अलील बाबा नशेवाला (रा. नेवासा) अशी जखमींची नावे आहेत. जखमी साहील यांनी दिलेल्या जबाबावरून 10 जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण मांजरे व त्याच्या इतर अनोळखी नऊ साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचा साथीदार 13 जून रोजी ओमनी कार (एमएच 15 सीडी 49899) मधून वासरे घेऊन नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून जात असताना पांढरीपूल येथील लिलियम पार्कजवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांची कार किरण मांजरे व इतरांनी अडवली. ‘तुम्ही कत्तलीसाठी वासरे घेऊन जात आहे’ असे म्हणून शिवीगाळ करत लाकडी दांडके, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करून जखमी केले.

‘परत जनावरे घेऊन आलास तर जिवे ठार मारून टाकू’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारादरम्यान साहील शेख यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून किरण मांजरेसह 10 जणांविरूध्द 15 जून रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दिवटे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या