Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला दोन राज्ये पुरवणार ऑक्सिजन

महाराष्ट्राला दोन राज्ये पुरवणार ऑक्सिजन

मुंबई –

महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. करोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. सध्या महाराष्ट्रात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. यापैकी 960 मेट्रिक टन ऑक्सिजन रूग्णांसाठी वापरण्यात येत आहे. पण सध्याच्या रूग्णसंख्येनुसार महाराष्ट्रात येत्या महिनाभरात 1500 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन मिळवण्यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे. दरम्यान,

- Advertisement -

महाराष्ट्राची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी आता देशातील दोन राज्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. गुजरात आणि छत्तीसगढ येथून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.

छत्तीसगढच्या भिलाई प्लँटमधून विदर्भासाठी तर गुजरातच्या जामनगरमधून संपुर्ण महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवण्यात येणार आहे.

दरम्यान, मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून केंद्रानेही मदत करावी असे आवाहन केले होते. तसेच दुसर्‍या राज्यातून महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणूनच हवाई दलाच्या मदतीने ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राने मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या