Tuesday, April 29, 2025
HomeनाशिकNashik Crime News : रेल्वेचा एक कोटी रुपये किंमतीचा मशीन पार्ट...

Nashik Crime News : रेल्वेचा एक कोटी रुपये किंमतीचा मशीन पार्ट चोरणारे संशयित जेरबंद; इगतपुरी पोलिसांची मोठी कारवाई

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

भारतीय रेल्वेने (टनेल) बोगद्याच्या कामासाठी लावलेल्या मशीनचा १ कोटी रुपये किंमतीचा पार्ट चोरीस (Part Theft) गेल्याप्रकरणी नवादा पोलीस, बिहार राज्यातील राजोली जि. ठाणे येथे शनिवार (दि.२१ ऑक्टोबर) रोजी भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

नांदगाव तालुक्यात मोठी कारवाई; देहव्रिक्री रॅकेटचा पर्दाफाश

त्यानंतर गुन्ह्यातील संशयित इगतपुरी परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर या गुन्ह्यात राजोली पोलीस ठाण्याचे (Rajoli Police Station) प्रभारी त्यांच्या पथकासह संशयितांच्या शोधासाठी इगतपुरी पोलीस ठाण्यात हजर झाले. यानंतर त्यांनी केलेल्या लेखी विनंतीवरून या गुन्ह्यातील सहभागी निपुरा मनोरंजन राय,(३०), नयन नरेश राय, (२३) या दोन संशयितांना इगतपुरी पोलिसांनी बिहार पोलिसांच्या (Bihar Police) स्वाधीन केले.

Nashik Fire News : लासलगाव येथे कॉम्प्लेक्सला भीषण आग; लाखोंचे नुकसान

दरम्यान, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि पोलीस पथकाने कसोशीने शोध घेऊन ही कामगिरी केली. याबाबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले आहे. तर गुन्ह्यातील चोरी केलेला १ कोटी रुपये किंमतीचा पार्ट पश्चिम बंगाल राज्यातील सिलीगुडी येथे पाठविला असल्याची कबुली संशयितांनी (Suspects) दिली असून त्याबाबत खात्री झाली आहे. तसेच चोरीस गेलेला माल हस्तगत करणेकामी बिहार पोलिसांचे दुसरे पथक पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) रवाना झाले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : कर्जाला कंटाळून युवकाची आत्महत्या

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....