Sunday, May 19, 2024
Homeनाशिकटोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ...

टोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमधील पिंपळगाव बसवंत टोल या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा पिंपळगाव टोलनाका चर्चेत आला आहे. या टोल नाक्यावर दोन महिलांची फ्री सताईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे….

- Advertisement -

टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल कर्मचारी महिला यांच्यात मारामारी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान, त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत पुणे येथे जात होते. त्यांनी बुधवारी संध्याकाळी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर स्वत:चे शासकीय कार्ड दाखवून खासगी वाहन सोडण्याची विनंती केली.

त्यावर टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरवाच लागेल, कार्ड चालणार नाही, असे सांगितले. यानंतर सीआरपीएफ जवानाच्या पत्नीमध्ये आणि टोल कर्मचारी महिलेत जोरदार बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर फ्री स्टाईल हाणामारीत झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या