Wednesday, November 20, 2024
HomeUncategorizedतरुणीचा हात पकडणे पडले महागात

तरुणीचा हात पकडणे पडले महागात

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

तरुणीचा हात पकडणे एकाला चांगलेच महागात पडले असून न्यायालयाने त्या तरुणाला दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. छत्रपती संभाजीनगरात ही घटना घडली आहे.  

- Advertisement -

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाके उडवणाऱ्या तरुणीला तू मला आवडते असे म्हणून तिचा हात पकडणारा आरोपी किरण किशोर शिंदे (३०, रा. नारळीबाग) याला दोन वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी एम.एस. सहस्त्रबुद्धे यांनी ठोठावली. विशेष म्हणजे आरोपीला ठोठावलेल्या दंडाच्या रक्कमेपैकी पाच हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडितेला देण्याचे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रकरणात १८ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. पीडिता ही पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. दिवाळीच्या सुट्या असल्याने ती छत्रपती संभाजीनगरात आपल्या घरी आली होती. ११ नोव्हेंबर २०१५ रोजी लक्ष्मी पूजन झाल्यावर पीडिताही बहिणीसोबत फटाके उडवत होती. त्यावेळी आरोपी किरण शिंदे तेथे आला. त्याने तू  मला आवडते, असे म्हणून फिर्यादीचा हात पकडून विनयभंग केला. पीडितेने आरडाओरडा करताच शेजारी राहणारे पोलीस उपनिरीक्षक ढोकरट यांनी पोलिसांना फोन केला. तर इतर शेजाऱ्यांनी आरोपीला पकडून ठेवले. पीडितेचे वडील तेथे आले असता, आरोपीने त्यांना शिविगाळ करून तुम्ही मला पोलिसात तक्रार केली तर मी उद्या जामीनीवर सुटेल मग तुला चांगले बघतो, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याताल आला होता.

प्रकरणात तत्कालीन उपनिरीक्षक मयुरी पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवळी सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादनानंतर साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी किरण शिंदे याला दोषी ठरवून भादंवि कलम ३५४ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक शंकर पवार आणि जमादार सुरेश शिंदे यांनी काम पाहिले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या