Monday, June 9, 2025
HomeनगरSuicide News : गळफास घेऊन दोन तरूणांच्या आत्महत्या

Suicide News : गळफास घेऊन दोन तरूणांच्या आत्महत्या

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

शहर व परिसरात दोन दिवसांत आत्महत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. सिध्दार्थनगर आणि चांदबिबी महाल या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये दोन तरूणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. दोन्ही घटनांमध्ये आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पोलीस तपास करत आहेत.

संतोष मोहीते (वय 35, रा. सिध्दार्थनगर) यांनी शुक्रवारी (6 जून) सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी घराच्या छतावरील लाकडी बल्लीला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. याची माहिती नातेवाईकांना लक्ष्यात येताच त्यांचा मेहुणा अजय बंडु काते यांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती सकाळी 10:55 वाजता मृत घोषित केले. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस अंमलदार रमेश शिंदे तपास करीत आहेत. दुसरी घटना चांदबिबी महाल येथे गुरूवारी (5 जून) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

अभिषेक कापले (वय 27, रा. आहेर वडगाव पाली, जि. बीड) यांनी चांदबिबी महाल परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. कापले यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. यासंदर्भात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दीड वर्षांपासून सहा पंचायत समित्यांना बीडीओंची प्रतिक्षा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीयदृष्ट्या जागृत असणार्‍या अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन वर्षापासून सहा पंचायत समितीमध्ये प्रभारी राज आहे. या ठिकाणी गटविकास अधिकारी पद रिक्त...