Sunday, January 25, 2026
HomeराजकीयSushma Andhare : उदय सामंत उपमुख्यमंत्री बनणार? एकनाथ शिंदेंची जागा घेणार?; महिला...

Sushma Andhare : उदय सामंत उपमुख्यमंत्री बनणार? एकनाथ शिंदेंची जागा घेणार?; महिला नेत्याच्या पोस्टने खळबळ

मुंबई । Mumbai

राज्यामध्ये एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सुरु आहेत तर दुसरीकडे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीवारी करुन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यामुळे चर्चांना उधाण आले. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे बंडखोरीच्या तयारीमध्ये असल्याचे देखील बोलले जात आहे. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत उदय सामंत यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. सुषमा अंधारे यांनी लिहिले आहे की, आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केले. पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले…!त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली…!!तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक मुत्सद्दी राजकारणी आहात हे सिद्ध केले…!!शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपण सत्तेसाठी कुणासोबतही जाऊ शकता हे सिद्ध केले…!!!!!! असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

YouTube video player

पुढे त्यांनी लिहिले आहे की, उदयभाऊ , आता उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जगजाहीर झाल्या आहेत का? कदाचित त्यामुळेच आपण आज वैतागून माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचे मुलाखतीत सांगत होतात. होय माझी आणि नरेश मस्के यांची नक्की भेट झाली. भेट घेतली नाही; भेट झाली..! दिल्ली महाराष्ट्र सदन च्या उपहारगृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली माझ्या समवेत माझ्या पक्षाचे खा . भाऊसाहेब वाकचौरे असताना बाजूला खा. भगरे गुरुजी असताना आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना माझी भेट झाली, असे सुषमा अंधारे यांनी लिहिले आहे.

विशेष ही भेट झाल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षप्रमुखांना ही माहिती दिली हे कदाचित आपल्याला माहित नसेल. पण तरीही मी समजूच शकते. उदय भाऊ, आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात..! आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलं तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण उदय भाऊ, आपला वार अगदीच बेकार गेला आहे. पण या निमित्ताने का असेना माझं बोलणं हे तुमच्या फार जिव्हारी लागलंय हे लक्षात आलं… असो.. हा फोटो मी काही सांगण्यापेक्षा जास्त बोलका आहे…! ताजकलम _ तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं आम्हालाही बोलवा बरं का..!!!असा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : गोल्ड डिलिव्हरीत दहा लाखांचा ‘झोल’; नामांकित सराफा उद्योगाकडून...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मुंबईतील नामांकित 'मलबार गोल्ड अँन्ड डायमंड' ने नाशिकमधील (Nashik) एका कुरिअर कार्यालयाकडे पाठविलेले दहा लाखांचे गोल्ड कॉइन 'डिलिव्हरी' दरम्यान संशयास्पदरित्या...