Friday, October 11, 2024
Homeमहाराष्ट्रसाताऱ्यात पुन्हा राडा; उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने

साताऱ्यात पुन्हा राडा; उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने

सातारा | Satara

साताऱ्यात शिवराज ढाब्याजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच भूमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) आमने सामने आल्याचे दिसून आले…

- Advertisement -

खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले. उदयनराजेंचा विरोध झुगारून शिवेंद्रराजे भोसले यांनी भूमीपूजन केले. यानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामुळे साताऱ्यात दोन्ही राजेंमधील वाद पुन्हा उफाळून आल्याचे चित्र आहे.

Nashik Crime News : अंगावरील दागिने लुटून वृद्ध महिलेची निर्घृण हत्या; गुन्हा दाखल

आज सकाळी दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजन होणार होते. मात्र नऊ वाजेच्या सुमारास उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यानंतर तेथे असलेले साहित्य फेकून दिले. तसेच, एक कंटेनरही जेसीबीच्या सहाय्याने उलटा करण्यात आला.

त्यानंतर शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारून त्यांच्या समोर भूमीपूजन केले. या घटनेमुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यात खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

उद्धव ठाकरेंची वाटचाल राष्ट्रीय राजकारणाकडे?

- Advertisment -

ताज्या बातम्या