Monday, April 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : "बाजारबुणगे महाराष्ट्रात येऊन…"; उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

Uddhav Thackeray : “बाजारबुणगे महाराष्ट्रात येऊन…”; उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

मुबंई | Mumbai

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Tour) असून त्यांच्या उपस्थितीत भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांची विभागनिहाय आढावा बैठक होत आहेत. आज ते नाशिकमध्ये (Nashik) असून त्यांच्या उपस्थितीत येथील हॉटेल डेमोक्रॉसी येथे उत्तर महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होत आहे. तर काल शहांच्या उपस्थितीत नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.

- Advertisement -

हे देखील वाचा :  Sanjay Raut : “अमित शाह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेताय याचा अर्थ…”; संजय राऊतांचे टीकास्त्र

या बैठकीत बोलतांना शाह यांनी विरोधकांना संपविण्याची भाषा केल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला असून त्यावरून त्यांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, “अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. काल त्यांनी नागपूरमध्ये बोलतांना आम्हाला खतम करण्याची भाषा केली. हे बाजारबुणगे महाराष्ट्रात येऊन आम्हाला संपविण्याची भाषा बोलतात, मात्र आगामी निवडणुकीत तेच संपतील.त्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा आहे. मात्र, त्यांना कल्पना नाही हा महाराष्ट्र वीरांचा आहे”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

हे देखील वाचा :  Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची धावपळ

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “आपल्याकडे बोलण्यासारखे खूप आहे. मात्र, बाजारबुणगे असा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. कारण अमित शाह उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खतम कर, पवारसाहेबांना खतम करा असे म्हणत आहेत. मात्र,हिंमत असेल तर त्यांनी येऊन बघावं महाराष्ट्र कुणाला खतम करतो ते दाखवून देऊ”, असे आव्हानही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच भाजपमधील नेते आमच्याकडे यायला सुरूवात झाली असून भाजपाचा उलटा प्रवास सुरू झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Accident News : कार आणि ट्रकचा भीषण अपघात; सात जण जागीच ठार

अमित शाह नेमकं काय म्हणाले होते ?

काल छत्रपती संभाजीनगरमधील संवाद बैठकीत बोलताना अमित शाह म्हणाले होते की, आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना रोखणे हेच भाजपाचे लक्ष्य असणार आहे. त्या दिशेने कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचे आहेत. जिथे-जिथे विरोधकांची ताकद आहे, तिथे-तिथे त्यांच्या पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात घ्या, अशा सूचना अमित शाहांनी मराठवाडा आणि विदर्भातील बैठकीत केल्या होत्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Central Government Decision : केंद्र सरकारचा पाकिस्तानला दणका; १६ यूट्यूब चॅनेलवर...

0
नवी दिल्ली | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताकडून (India) पाकिस्तान विरूद्ध विविध स्तरांवर कारवाई सुरू आहेत. अशातच आता भारत सरकारच्या गृह...