Friday, November 22, 2024
HomeराजकीयUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले; म्हणाले, "होय मी रस्त्यानेच...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले; म्हणाले, “होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच…”

मुंबई । Mumbai

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आज कोकणात तीन सभा घेणार आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे सभा होत असून या दौऱ्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे वादाचा पुढला अंक लिहिला जाईल अशी जोरदार चर्चा कोकणात सुरु आहे.

- Advertisement -

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज कोकणातील पहिल्याच सभेत खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. काही दिवसापूर्वी खासदार राणे यांनी कोकणात येताना हेलिकॉप्टरने नको, रस्त्याने या’,अशी टीका केली होती. या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मला मध्ये कोणीतरी आव्हान दिले की हेलिकॉप्टरने येऊ नका, रस्त्याने या. होय मी रस्त्यानेच येतो आणि रस्त्यानेच जातोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांचे नाव न घेता केली. पुतळा पडल्यानंतर ही शिवदृोही माणस आदित्य ठाकरे आणि तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर बाहेर ठणाणा करत बसली होती. ही लोक शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहेत, असंही ठाकरे म्हणाले. आमच्यावर आरोप करा ते राजकारण आहे. पण तुमची काळीकृती ती आजपर्यंत खूप झाली. गेल्यावेळी यांचे घोडे गंगेत नाहले, पण ही चूक पुन्हा करु नका, असंही ठाकरे म्हणाले.

तसेच, ठाकरे म्हणाले की रोज मी महाराष्ट्रभर फिरत आहे. आज तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. गेल्यावेळी काही गडबड झाली समजले नाही, संभ्रम निर्माण करण्यात आला, इथल्या कुठल्यातरी मैदानात टेबल टाकण्यात आली होती. मात्र, ती टेबल एका दिवसासाठी होती. मात्र, तुम्ही तुमचा आयुष्य त्यांच्या हातात दिलं असल्याचे ते म्हणाले. आपलं कोकण म्हणजे आयुष्य आहे. त्या गुंडांच्या हातात देऊ नका ते वकवक करत आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर प्रहार केला.

ते पुढे म्हणाले की दीपक केसरकर तर खाली मुंडी आणि पातळधुंडी आहे. 2014 मध्ये चांगला माणूस म्हणून आव आणला होता. मनी नाही भाव देवा मला पाव अशी केसरकरांची स्थिती असल्याचा हल्लाबोल सुद्धा ठाकरे यांनी केला. मोदी स्वतः या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आले मात्र ते ढोंगी असल्याची टीका त्यांनी केली. दाढीवाला मिंधे म्हणतो पुतळा वाऱ्याने कोसळला, केसरकर पुतळा कोसळला चांगलं झालं म्हणतो, मात्र केसरकर पडल्यानंतर महाराजांचा चांगला पुतळा होईल असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. ठाकरे यांनी सत्ता येताच चांगलं हॉस्पिटल उभारणार असल्याची ग्वाही दिली.

ते म्हणाले की, दीपक केसरकर अदानीसाठी जागा शोधत होते, कोकण आदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. माझं सरकार आलं तर अदानीकडून जमिनी घेणार आणि गिरणी कामगारांना देणार असल्याचे ते म्हणाले. शेतकरी महाराष्ट्रामध्ये त्रस्त आहेत मी त्यांना कर्जमुक्त केलं. सरकार आले की पुन्हा एकदा कर्जमुक्त करणार असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या