Saturday, October 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: गरीब शेतकऱ्याचा पोरगा हेलिकॉप्टरने शेतात जातो, लंडनला जाऊन पुरस्कार विकत...

Uddhav Thackeray: गरीब शेतकऱ्याचा पोरगा हेलिकॉप्टरने शेतात जातो, लंडनला जाऊन पुरस्कार विकत घेतो; उध्दव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati SambhajiNagar
पुरस्कार श्री, स्वतःच स्वतःला पुरस्कार घेत आहेत. आमदार-खासदार तर विकत घेत आहेत, पुरस्कार पण विकत घेत आहेत, आपल्याला सांगतील, “ये तुमसे ना हो पाएगा, हा एवढा निर्लज्जपणा तुम्हाला नाही जमणार” म्हणजे ते उलट आपल्याला सांगतील, “जो हमने किया, पुरस्कार खरीद लिया, ये तुमसे ना हो पाएगा!” जे स्वतःच्या विकासासाठी तिकडे गेलेत, मराठवाड्याच्या विकासाचं नाव घेऊन, त्यांनी हिम्मत असेल, तर मराठवाड्याच्या व्यथा छातीठोकपणे पंतप्रधानांच्या समोर मांडू शकता का? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

आमदार-खासदारांच्या फोडाफोडीवरून निशाणा
माध्‍यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्‍हणाले की, आमदार, खासदार आता पुरस्कारही विकत घेतायत. आज जरांगे मुंबईला चालले होते. एक माणूस प्राणपणाने लढतोय. दुसरा लंडनमध्ये जाऊन पुरस्कार घेतोय. मंत्रिमंडळातील हे बसरे बैल तुम्हाला न्याय देतील का, असा सवाल करत जाहिरातबाजी करायला यांच्याकडे पैसे आहेत. गरीब शेतकऱ्याचा पोरगा हेलिकॉप्टरने शेतात जातो. लंडनला जाऊन पुरस्कार विकत घेतो, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

जवळच्यांची चौदाशे कोटींची काम थांबवल्यामुळे जरांगेनी आंदोलन पुकारलं; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

न्याय हक्कासाठी उठवलेल्या आवाजाबद्दल तुम्हाला माफ करतील
उद्धव ठाकरे म्हणाले, मराठवाड्यासाठी झालेल्या अन्यायावर, अन्यायाबद्दल जे काही तुम्ही वाचा फोडत आहात, तुम्हाला सगळ्यांना आपले दयाळू पंतप्रधान माफ केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे कर्जमाफी नाही करणार, पण तुम्ही न्याय हक्कासाठी उठवलेल्या आवाजाबद्दल तुम्हाला ते नक्की माफ करतील. उद्धव ठाकरे म्हणाले की, ते नुसते बोर्ड बघून मी गेलो, मला असं वाटलं की, मराठवाड्यात तर काय आनंदी आनंदच आहे. इकडे दुष्काळ कुठे? इकडे तर दुधाचा पाऊस पडत असेल, पण जमिनीवर काय आहे? हा मुद्दा कोणाच्याच लक्षात येत नाही.

उपमुख्यमंत्री ढोकळा खायला तिकडे गेले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे, तो कसा साजरा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शहरात चांगले बोर्ड लागलेत. हे बोर्ड पाहिल्यावर आनंदीआनंद वाटेल; पण वास्तव परिस्थिती काय आहे, असा सवाल करत मुख्यमंत्री इथे असतील तर त्यांनी येऊन उत्तरे द्यावीत. उपमुख्यमंत्री ढोकळा खायला गेलेत तिकडे, पण इकडे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला आले नाहीत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाडा हा लढणारा आहे, रडणारा नाही. शेतकरी आत्महत्या करण्यासाठी लढा दिलात का तुम्ही, असा सवालही त्यांनी केला.

सरकारमध्ये अकलेचा दुष्काळ
शेजारील राज्य कर्नाटकमधील सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पण महाराष्ट्राच्या सरकारने पंचांगात ५ ऑक्टोबरचा मुहूर्त दिलाय. खड्ड्यात घाला तुमचा मुहूर्त. सरकारमध्ये अकलेचा दुष्काळ आहे. जोपर्यंत सत्तेचे लोडशेडिंग करत नाही तोवर तुम्हाला न्याय मिळणार नाही. आजची ही ठिणगी आहे. सरकारला लाज असेल तर त्यांनी तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

ताज्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर २०२६ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात...