पुणे | Pune
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत घेतलेल्या शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर कठोर शब्दांत हल्लाबोल केला होता. विशेष म्हणजे, “एक तर तू राहशील किंवा मी राहीन”, असेही ठाकरेंनी म्हटले होते. या विधानानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा पुण्यात (Pune) झालेल्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्र सोडले.
हे देखील वाचा : ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, “मी ढेकणाला…”
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी पुण्यात (Pune) भाजपाचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात आपण डोकावले, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असे म्हणावे लागेल. त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. त्यातून काही शहाणपण यांनी घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते. पण ते (अमित शाह) परत का आले? तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले, हे पाहण्यासाठी आले होते, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik News : कसारा घाटातील रेल्वे बोगद्या बाहेर दरड कोसळली
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह (Amit Shah) आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता. नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचं का? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे ते म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे विश्वासघातकी लोक हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमच्याशी विश्वासघात केला”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली.
हे देखील वाचा : Nashik Fraud News : शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवत सव्वा काेटी रुपये उकळले
पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “दोन दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) सभेत बोललो की, एक तर तू राहशील किंवा मी राहिल. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेले होते. त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण? याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी सांगितली. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान दिले जात नाही, ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतले. त्याने सांगितले माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस”, अशी टीका ठाकरेंनी फडणवीस यांच्यावर केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा