Thursday, July 4, 2024
Homeराजकीय'अंबादास दानवेंच्या विधानाबद्दल महाराष्ट्राची माफी मागतो, पण…', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव...

‘अंबादास दानवेंच्या विधानाबद्दल महाराष्ट्राची माफी मागतो, पण…’, विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधीमंडळात केलेल्या शिवीगाळ प्रकरणी त्यांची पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत उद्धव ठाकरे निषेध केला आहे. तसेच अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राची देखील माफी मागितली. तसेच सुधीर मुनगंटीवार, अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे एखादा प्रस्ताव आल्यावर चर्चा करण्याची गरज आहे. अंबादास दानवे यांना बोलू दिलं नाही. पण परस्पर निलंबन करण्यात आलं. मी विधान परिषदेत नव्हतो, दानवे यांनी शिवीगाळ केली त्याबद्दल महाराष्ट्राच्या माता भगिनींची माफी मागतो.

हे देखील वाचा : ४० रुपये दर द्या, अन्यथा मुंबईला जाणारा दूध, भाजीपाल्याचा पुरवठा रोखू; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

पण सुधीर मुनगंटीवार यांनी मोदींच्या सभेमध्ये त्यावेळी नरेंद्र मोदी व्यासपीठावर नसतील, पण तेव्हा मुनगंटीवार यांनी बहिण भावाच्या नात्याबद्दल अभद्र वक्तव्य केलं होतं, त्याबद्दल कोण माफी मागणार? अब्दुल सत्तार हे सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलले होते. शिवी दिली होती, तेव्हा महिलांचा अपमान झाला नाही का? त्यावेळी त्यांना निलंबित का केलं नाही? सभागृहात बोललं आणि सभागृहाबाहेर लोकप्रतिनिधींनी बोलणं यामुळे महिलांचा अपमान होत नाही का? असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारले. तसंच मुनगंटीवार यांना जनतेनं तर निलंबित केलं आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवार यांना टोला लगावला.

तसेच, आता देशात आणि राज्यात जे काही चाललं आहे, आपल्याला माहिती आहे की विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं. सभागृहात एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करण्याची गरज असते. त्यावर विरोधी पक्षाची भूमिका मांडू देणं गरजेचं असतं. त्यानंतर निर्णय देत असतात. मात्र, एकतर्फी निर्णय देणं हे लोकशाहीला घातक आहे. खरं तर अंबादास दानवे यांनाही त्यांची बाजू मांडू देण्याची आवश्यकता होती. विरोधी पक्षाकडून कोणालाही बाजू मांडू देण्यात आली नाही. जणूकाही हे सर्व ठरवूनच षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलं, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

हे देखील वाचा : पावसाने पुन्हा जोर धरला! अनेक भागांसाठी अलर्ट जारी

विधानपरिषदेत नेमकं काय घडलं?

लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटल्याचे पाहायला मिळाले. आमदार प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात सुमोटो प्रस्ताव मांडला तर प्रसाद लाड हेही आक्रमक झाले होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे बोलायला उभे राहिले असता, प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे पाहून काहीतरी हातवारे केले. त्यामुळे दानवे संतप्त झाले आणि त्यांनी थेट प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यावर अंबादास दानवे यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सभागृह चालायला देणार नाही, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी अंबादास दानवेंवर कारवाई करण्याची मागणी केली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : शेअर ट्रेडिंगमधील नफ्याचे आमिष दाखवून ३७ लाख रुपये उकळले

- Advertisment -

ताज्या बातम्या