Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik Crime News : शेअर ट्रेडिंगमधील नफ्याचे आमिष दाखवून ३७ लाख रुपये...

Nashik Crime News : शेअर ट्रेडिंगमधील नफ्याचे आमिष दाखवून ३७ लाख रुपये उकळले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरात शेअर मार्केट (Share Market) व ट्रेडिंगच्या जाळ्यात फसणाऱ्यांची संख्या वाढतच असून त्यात अनुभवी गुंतवणूदार, शेअर्सधारक आणि ट्रेंडिंग करणाऱ्यांनाही काेट्यवधी ते लाखाे रुपयांचा गंडा घातला जात आहे. कारण, पंचवटीतील हिरावाडीत राहणाऱ्या एका साॅफ्टवेअर इंजिनिअरलाही सायबर चाेरट्यांनी (Cyber Thieves) तब्बल ३६ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत सायबर पाेलीस ठाण्यात सायबर चाेरट्यांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

याेगेश प्रवीण मुर्डेश्वर(वय ३६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते साॅफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांना १९ मार्च ते १५ मे २०२४ या कालावधीत सायबर चाेरट्यांपैकी ऑक्टाेपस स्टाॅक-ए-८ चा टेलिग्राम व व्हाट्स ॲप ग्रुप ऑपरेट करणारे ॲडमिन, प्राेफेसर रोहन कुलकर्णी याने (8565035125) या क्रमांकवरुन आणि राजेश पंडीत (असिस्टंट) याने 8972942528 या क्रमांकावरुन संपर्क साधला. त्यानंतर, शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लाॅक ट्रेंडिंग, आयपीओची माहिती देत विश्वास संपादन केला.

त्यानुसार संशयितांनी (Suspect) त्यांना लाझर्ड आयएनडी हे ट्रेडिंग ॲपडाऊन लाेड करण्यास सांगितले. ते केले असता बऱ्याच गाेष्टींवर, परताव्यावर विश्वास बसल्याने याेगेश यांनी काही रक्कम गुंतविली असता, त्यांना आभासी स्वरुपात पैशांचा परतावा दर्शविण्यात आला. त्यामुळे विश्वास बळकट झाल्याने याेगेश यांनी आणखी रक्कम गुंतविली. त्यानुसार ते सायबर चाेरट्यांच्या जाळ्यात फसवत गेले. त्यांनी तब्बल ३६ लाख ७० हजार रुपये गुंतविले.

मात्र, अनेक दिवस उलटूनही परतावा न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यातच काही दिवसांनी संशयितांशी संपर्क हाेत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी वरील संशयितांसह ज्या बँक खात्यांत पैसे वर्ग झाले, त्यांच्याविरुद्ध फसवणुकीची (Fraud) फिर्याद दाखल केली आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करत आहेत. 

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या