Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयUddhav Thackeray : "आमचे सरकार आल्यानंतर महिनाभरात तुमचा हिशोब..."; उद्धव ठाकरेंचा महायुतीला...

Uddhav Thackeray : “आमचे सरकार आल्यानंतर महिनाभरात तुमचा हिशोब…”; उद्धव ठाकरेंचा महायुतीला थेट इशारा

मुंबई | Mumbai

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबईच्या विलेपार्ले पूर्व येथे ‘नव्या वाटा नवी संधी, उज्वल भविष्यासाठी साथ शिवसेनेची’ महानोकरी मेळावा आयोजित करण्यात आला असून या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी १४० नामांकित कंपन्यांनी येथे रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर पात्र ठरलेल्या तरुणांना जागेवरच ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेवर (Shivsena) टीका केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : महाराष्ट्रात NIA आणि ATS ची तीन जिल्ह्यांत छापेमारी; तिघे जण ताब्यात

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबई (Mumbai) महाराष्ट्राला (Maharashtra) मिळाली, पण मुंबईत मराठी माणसांसाठी दारे बंद होती. मुंबईत मराठी माणसाला उद्योग आणि रोजगाराची संधी मिळत नव्हती. मग त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब म्हणत होते, रोजगार मागणारे नाही देणारे व्हा. राज्यासाठी इतर पक्षांनी काय केले आणि शिवसेनेने काय केले? हे पहिल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रासाठी जे केले आहे त्याचा अभिमान आम्हाला आहे. त्यामुळे हा एक समाधानाचा क्षण आहे.आज दंगली भडकण्याचे राजकारण सुरु आहे. हिंदू मुस्लिम भांडण लावायचे. मग तरुणांचे काय त्यांच्या कामाचे काय? मोदी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्पांचे भूमिपूजन करतात. मग शिवस्मारकाचे भूमिपूजन होऊन किती वर्ष झाली त्या कामाचं काय झालं? या प्रकल्पामध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे घरं भरले जातात”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Rahul Gandhi : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान…”; राहुल गांधींचा कोल्हापूरातून मोदींवर निशाणा

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “आमचे हिंदुत्व (Hindutva) घरातील चूल पेटवते, त्यांचे हिंदुत्व घर पेटवते. त्यामुळे त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेनेमुळे लाखो युवक, युवतींना रोजगार (Employment) मिळाले आहेत. मराठी माणसांना नो एन्ट्री असे बोर्ड जेथे असेल ते दार आम्ही तोडणार आहोत. राज्यात भूमीपुत्रांचा मान राखला गेला पाहिजे. अडीच वर्षांत एकही मोठा प्रकल्प सुरु नाही. आज एकही गुंतवणूकदार महाराष्ट्रात (Maharashtra) येण्यास तयार नाही”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

हे देखील वाचा : वाशिमच्या सभेतून PM मोदींचा काँग्रेससह महाविकास आघाडीवर घणाघात; म्हणाले…

तसेच मोदीजी (Modi) तुम्ही महाराष्ट्रात येऊन जेवढ्या फिता कापायच्या त्या कापून घ्या. विधानसभेत आमचं सरकार आल्यानंतर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. लोकसंख्या वाढते पण रोजगार कोणीच देत नाही. मुलगी शिकली प्रगती झाली पंधराशे देऊन घरी बसवली असे आम्ही करत नाही. दीड महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले गद्दार बेकार होणार आहेत. परंतु, त्यांना नोकऱ्या मिळणार नाही, आम्ही त्यांना रोजगार देणार नाही. एकाही गद्दारास नोकऱ्या देणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर महिनाभरात तुमचा हिशोब मांडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा थेट इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...