Sunday, September 8, 2024
HomeराजकीयUddhav Thackeray : मोदी-शाहांचा मुंबईला 'अदानी सिटी' बनवण्याचा डाव; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

Uddhav Thackeray : मोदी-शाहांचा मुंबईला ‘अदानी सिटी’ बनवण्याचा डाव; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

मुबंई | Mumbai

आगामी विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही महिन्यांवर आल्याने राज्यातील महायुती सरकारकडून (Mahayuti Government) जनतेसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात येत आहेत. सरकारने आणलेल्या या योजनांवर विरोधकांकडून कडाडून टीका केली जात आहे. अशातच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारने आणलेल्या योजनांवर टीकास्त्र सोडत सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील; राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाबिघाडी सरकारकडून फसव्या योजनांचा पाऊस पाडला जात आहे. त्यांचा आतापर्यंतचा कारभार विसरून आणि फसव्या योजनांना भुलून जनता मतदान करेल, अशी त्यांची वेडी आशा आहे.या योजनांमध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना आहेत. याशिवाय लाडका मित्र, लाडका कंत्राटदार किंवा लाडका उद्योगपती ही योजनाही सरकारने आणली आहे. या योजनेविरोधात मागच्या वर्षी मोर्चा काढला होता. धारावी पुनर्वसन प्रकल्पात धारावीकरांना हक्काचे घर तिथेच ५०० चौरस फूटांचे असले पाहीजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : UPSC चे अध्यक्ष मनोज सोनींचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

पुढे बोलतांना उद्धव ठाकरेंनी म्हटले की, “धारावी ही झोपडपट्टी नाही तर त्यामध्ये वेगळेपण आहे. धारावीतील प्रत्येक घरांमध्ये छोटे-उद्योग धंदे चालतात. त्यांचं काय करणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. बेसुमार टीडीआर काढून अदानीला द्यायचा डाव आम्ही उधळून लावणार आहोत. तो यशस्वी होऊन देणार नाही. हे सरकार कॉन्ट्रॅक्ट मित्राचे चांगभलं करत आहेत. मोदी आणि शाहांनी गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळवून नेली. आता उद्या ते मुंबईचे नाव बदलून अदानी सिटी करतील. पण आम्ही ते होऊन देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चवळीचे उदाहण आहेच. मराठी माणूस मुंबई वाचवतो. मुंबई बचाव समिती वैगरे नाही तर मुंबई रक्षक समिती असली पाहिजे. मुंबईला लुटून भिकेला लावायचे काम याचे सुरू आहे पण ते आम्ही करून देणार नाही. अदानींना धारावी देण्याचा यांचा डाव उधळून लाऊ”, असेही ठाकरेंनी सांगितले.

हे देखील वाचा : अधिकार्‍यांचा दृष्टीकोन यापुढे संपूर्ण सरकारी असला पाहिजे – गृहमंत्री अमित शाह

तसेच “धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूवहात अडकवून हकलवून द्यायचे हा यांचा प्रयत्न आहे. पण आम्ही एकाही धारावीकराला तिकडून जाऊन देणार नाही. आम्ही धारावीकरांसोबत आहोत. धारावीकरांना पात्र अपात्रेचा निकष लावून धारावी रिकामी करण्याचे याचे काम सुरू आहे. रिकामी केलेली धारावी अदानीच्या घश्यात अलगद जाईल. मग तिथे भूखंडाचे श्रीखंड लाटण्यासाठी हे तयार होतील. हे कारस्थान मुंबईचे नागरी संतुलन बिघडवण्यासाठीचा डाव आहे. मानसिक संतुलन बिघडलेली माणसं सर्वांना माहिती आहेत ते काय काय करतात. काही जणांच्या मानसिकतेला बुरशी आली आहे”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

हे देखील वाचा : ‘लाडकी बहीण योजने’चे फॉर्म ‘मविआ’च्या कार्यकर्त्यांकडे देऊ नका; रावसाहेब दानवेंचे आवाहन

त्यासोबतच “धारावीचा आराखडा कोणाला माहित नाही. लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्ट्यांची जागा हे सरकार अधिग्रहण करत आहे. लाडका मित्र, लाडका भाऊ यासाठी हे सगळं सुरू आहे. धारावी टाऊंनशीपच्या आराखड्याचा कुठेही उल्लेख नाही. पण आमचं सरकार आलं तर आम्ही धारावीकरांचं तिथेच पुनर्वसन करून देऊ. तसेच त्यांच्यासाठी नवीन इंडस्ट्रिअल इस्टेट बांधून देऊ. आम्ही मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही. गरज असेल तेव्हा आम्ही नवीन टेंडर काढू. धारावीचा विकास नेमका काय ते स्पष्ट करू. अदानीला झेपत नसेल तर टेंडर रद्द करा”, असे मतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या